इंदाळा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दीय जयंती महोत्सव तथा समाज भवन उद्घाटन सोहळा संपन्न.

इंदाळा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दीय जयंती महोत्सव तथा समाज भवन उद्घाटन सोहळा संपन्न.


एस.के.24 तास


गडचिरोली : इंदाळा येथे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशाताब्दीय जयंती महोत्सव तथा समाज भवन उद्घाटन सोहळा संपन्न झाले.कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.तुषार मर्लावार अध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती नागपूर हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विस्तारी फेबुलवार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता नवेगाव हे होते. 


प्रमुख पाहुणे मुखरुजी ओगेवार, रामचंद्र नंदावार, मारोती जेंगठे सरपंच इंदाळा बंडूजी कंकलवार पोलीस पाटील इंदाळा, भास्कर लोही धनगर महासंघ सरचिटणीस नागपूर विभाग, विकास गेडाम उपसरपंच इंदाळा,संतोष जेंगठे तंटामुक्ती अध्यक्ष इंदाळा, मारगाये साहेब ग्रामसेवक इंदाळा, राजाराम उईनवार सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक इंदाळा,डॉ. नारायण करेवार कार्याध्यक्ष धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, शाखा गडचिरोली,सोनाली करेवार महिला संघटिका धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा गडचिरोली,


सर्व ग्रामपंचायत सदस्य इंदाळा,दिलीप मल्लेरवार क्षेत्र सहा.मुरूमगाव, संजय कंकलवार क्षेत्र सहाय्यक पुराडा,दशरथ चलाख शिक्षक, बिराजी शिर्गेवार अध्यक्ष नवयुवक धनगर कुरमार समाज इंदाळा, उपाध्यक्ष परशुराम राचेवार,भारत उईनवार, ईश्वर कंकलवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 


अनेक संघर्ष करून मराठ्यांचे स्वराज्य अहिल्यादेवी होळकर यांनी टिकवून ठेवले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या मुलांना शिकवून स्वतःच्या पायावर उभे करावे. असे प्रतिपादन तुषार मर्लावार यांनी केले. अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी समाजाची एकता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे असे मार्गदर्शन विस्तारी फेबूलवार यांनी केले. गावातील चिमुकल्यांनीही अहिल्याबाईचे जीवनकार्य यावर प्रकाश टाकला. 


कार्यक्रमात नवनियुक्त कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी  तसेच दहावी, बारावी उत्तीर्ण  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन  मारोती आरेवार यांनी केले. आभार प्रदर्शन रितेश उईनवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नवयुवक धनगर समाज इंदाळाचे सदस्य व महिलांचे सहकार्य लाभले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !