पिकअप - ट्रकची समोरासमोर धडक झाली.या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळावर मृत्यू.

पिकअप - ट्रकची समोरासमोर धडक झाली.या भीषण अपघातात  दोघांचा घटनास्थळावर मृत्यू.


एस.के.24 तास


चंद्रपूर : अहेरी मार्गांवरील गणपूर जवळ पिकअप  - ट्रकची समोरासमोर धडक झाली.या भीषण अपघातात  दोघांचा घटनास्थळावर मृत्यू झाला.तर एक गंभीररित्या जखमी झाला आहे.ही घटना दि.12 जून शुक्रवार रोजी 6 वाजताचा दरम्यान घडली. 


ओव्हरटेक करण्याचा नादात अपघात झाल्याच्या सांगितले जातात.संदीप कुलमेथे, रमेश वाढई असे मृतकांची नावे. तर चालक गणेश मडावी हा गंभीररित्या जखमी झाला आहे.उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.प्राप्त माहिती नुसार, कोठारी येथून किराणा सामान घेऊन पिकअप क्र. MH. 35 T T 8899  गोंडपिपरीकडे निघाली होती.


गणपुर येथील घटना ओव्हरटेक करणे पडले महागात.


पिकअपमध्ये कोठारी येथील संदीप कुलमेथे, रमेश वाढई, कवडजई येथील गणेश मडावी हे तिघे होते.गोंडपिपरी येथून बल्लारपूर कडे जाणार्‍या ट्रकला क्र.MH.40. DF 1437  पिकअपने समोरासमोर धडक दिली.या भीषण अपघातात पिकअप मधील संदीप कुलमेथे, रमेश वाढई याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.  


गणेश मडावी हा गंभीररित्या जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कोठारी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !