गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर ३९ खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरू ; शासनाच्या धोरणामुळे शेतकरी राजा हवालदिल.


गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर ३९ खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरू ; शासनाच्या धोरणामुळे शेतकरी राजा हवालदिल.



एस.के.24 तास

गडचिरोली : रब्बी हंगाम २०२४ - २५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेनुसार जिल्ह्यातील एकूण ३९ खरेदी केंद्रांवर रब्बी धानाची खरेदी सुरू करण्यात आली आहे.धान खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब लावण्यात आला.असल्याने शासनाच्या धोरणामुळ शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या अधिकृत खरेदी केंद्रावर विहित नियम व अटींचे पालन करून धान विक्री करावी.

या खरेदी केंद्रांवर शासनाने निश्चित केलेल्या  २३०० रूपये  प्रति क्विंटल या दराने धानाची खरेदी करण्यात येत  आहे.  त्यासाठी  कुरखेडा तालुक्यात – १७  धान खरेदी केंद्र, कोरची तालुका – ४ खरेदी केंद्र, आरमोरी तालुका – ३ खरेदी केंद्र, देसाईगंज तालुका – १ खरेदी केंद्र, गडचिरोली तालुका – ३ खरेदी केंद्र, धानोरा तालुका – २ खरेदी केंद्र तसेच सिरोंचा तालुक्यातील – ९ खरेदी  केंद्र  निश्चित करण्यात आले आहेत. 

सदर खरेदी केंद्रांचे संचालन आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि महामंडळाच्या माध्यमातून केले जात आहे. शासनाच्या आधारभूत किंमत योजनेचा लाभ घ्यावा यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या अधिकृत खरेदी केंद्रावर विहित नियम व अटींचे पालन करून धान विक्री करावी आणि अधिकृत पावती घ्यावी,असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक, गडचिरोली यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !