१,८२,००० रूपयांची रोख रक्कम भामरागड येथील चोरी प्रकरणातील आरोपी ओळख लपवुन तेलंगणा राज्यात वावरत असताना घेतले ताब्यात.


१,८२,०००  रूपयांची रोख रक्कम भामरागड येथील चोरी प्रकरणातील आरोपी ओळख लपवुन तेलंगणा राज्यात वावरत असताना घेतले ताब्यात.


 एस.के.24 तास 


भामरागड : भामरागड शहरात दिनांक ३० मे रोजीच्या पहाटेच्या दरम्यान संदीप मोगरे हे आपल्या परिवारासह राहते घरी झोपले असताना अज्ञात चोरट्याने घराचा आतुन बंद असलेला दरवाजा उघडुन आत प्रवेश करुन बेडरुममधील कपाटात असलेली १,८२,०००  रूपयांची रोख रक्कम लंपास केली होती. 


त्याबाबत संदीप मोगरे यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन भामरागड पो. ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणातील आरोपीस भामरागड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


चोरट्याचा कोणताही मागमोस नसताना तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कुणीही नसताना केवळ गुप्त बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारावर भामरागड पोलिसांनी बामनपल्ली येथील रहिवाशी व सध्या शिक्षणासाठी भामरागड शहरात भाड्याने राहत असलेला अंकुश जयराम झोडे(२१) याच्यावर संशय वाटला. जसजशी तपासाची चक्रे फिरु लागली तसतसा अंकुश झोडे हा मोबाईल बंद करुन लपुन बसला. त्यामुळे पोलीसांना त्याच्यावरील संशय गडद झाला. 

संशयीताचे कुटुंबिय व मित्र अशा सुमारे ३८ लोकांकडे केलेल्या सखोल चौकशीतुन व घटनाक्रमातुन सदरील गुन्हा हा अंकुश झोडे यानेच केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पथक पोहोचले. तोपर्यंत संशयीत अंकुश झ गोडे हा काही दिवस अहेरी परिसरात राहुन तेलंगणा राज्यातील करीमनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ओळख लपवुन कामाच्या शोधात गेला होता. तांत्रीक तपासातुन व साक्षीदारांकडील चौकशीतुन त्याचा ठावठिकाणा शोधण्यात पोलीसांनी यश मिळवले व दिनांक १४ जून २०२५ रोजी त्याला  तेलंगणा राज्यातील करीमनगर  येथुन ताब्यात घेवुन अटक केली.

तपासामध्ये त्याने चोरीच्या पैश्यातुन चंद्रपुर येथुन मो. सायकल खरेदी केल्याचे तसेच दारु व चैनीसाठी पैश्याचा वापर केल्याचे समोर आले आहे.संबंधीत मो.सायकल, त्याने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व रोख रक्कम पोलीसांनी हस्तगत केली आहे. 

सदरील गौरवपुर्ण कामगिरी भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी  अमर मोहिते, भामरागड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक  दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक निकीता खडेकर,पोलीस नायक  ज्ञानेश्वर निलावार,पोलीस अंमलदार रामेश्वर जवरे ,आकाश सिडाम यांनी केली .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !