लाईनमॅन ने स्वखर्चाने बुद्ध विहाराला दिले विद्युत कनेक्शन.

लाईनमॅन ने स्वखर्चाने बुद्ध विहाराला दिले विद्युत कनेक्शन.


एस.के.24 तास


सावली : सावली तालुक्यातील मौजा जनकापुर रिट  येथील बौद्ध बांधव बौद्ध विहारातील विद्युत कनेक्शन च्या प्रतीक्षेत होते परंतु तेथील समाज बांधवांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे अनेक दिवसापासून विद्युत  कनेक्शन च्या प्रतीक्षेत असतानाही ते बौद्ध विहारात विद्युत चे कनेक्शन घेऊ शकले नाही. 


तेव्हा त्याच गावामध्ये कार्यरत असलेले महावितरण पाथरी शाखेतील लाईनमेन श्री. प्रकाश बबन भसारकर  यांनी सामाजिक दायित्वामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी बौद्ध विहारांमध्ये स्वतःच्या खर्चाने विद्युत कनेक्शन दिले.


व समाज बांधवांनी आपल्या मुलांना विहारात पाठवून संस्कारित करण्याचे आव्हान केले त्यांच्या या सामाजिक कार्याचे जनकापुर रिट येथील .धनराज ढवळे अध्यक्ष, देवराव चौधरी सचिव, सुनीता उंदिरवाडे ग्रामपंचायत सदस्य, सरिता चौधरी, मलाबाई लाडे, हितेश वालादे देविदास मेश्राम या समाज बांधवांनी अभिनंदन करून विशेष आभार मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !