डॉ.धनराज खानोरकर लिखित झाडी लोकसंस्कृतीच्या " संजोरी " ग्रंथाचा प्रकाशन सोहळा. ◆ प्रा.सुरेश द्वादशीवार व डॉ.प्रमोद मुनघाटेंची उपस्थिती.

डॉ.धनराज खानोरकर लिखित झाडी लोकसंस्कृतीच्या " संजोरी " ग्रंथाचा प्रकाशन सोहळा.


प्रा.सुरेश द्वादशीवार व डॉ.प्रमोद मुनघाटेंची उपस्थिती.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक. 


ब्रम्हपुरी : दिनांक,०४/०६/२५ एकंदरीत झाडीपट्टीची लोकसंस्कृती,लोकपरंपरा व लोकजीवनावरील नोंदीचा ललित गद्यलेखसंग्रह " संजोरी " या प्रसिद्ध कवी,लेखक डॉ.धनराज खानोरकर लिखित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा


चंद्रपूर येथील वरोरा नाका चौकातील श्रमिक पत्रकार भवनामध्ये शुक्रवार दिनांक ०६ जून २०२५ रोजी सायं.५.३० वा.ज्येष्ठ संपादक व प्रसिद्ध कादंबरीकार प्रा.सुरेश द्वादशीवारांच्या शुभहस्ते होत आहे.यावेळी 'संजोरी' ग्रंथावर नागपूरचे ज्येष्ठ लेखक व समीक्षक डॉ.प्रमोद मुनघाटे भाष्य करतील.

    

सदर ग्रंथ कोल्हापूरच्या भाषाविकास संशोधन संस्थेने प्रकाशित केला असून प्रकाशन सोहळा झाडी बोली साहित्य मंडळ,चंद्रपूरद्वारे पार पडणार आहे.याप्रसंगी झाडी बोलीचे भाष्यकार डॉ.श्याम मोहरकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर उपस्थित असणार आहेत.

प्रास्ताविक व संचालन मंडळाचे अध्यक्ष कवी अरुण झगडकर करणार असून कवी प्रशांत भंडारे सर्वांचे आभार मानतील.कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा झाडी बोली साहित्य मंडळाने केले आहे .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !