चक्क ट्रॅक्टर लावून सिरोंचा वनविभागाने नांगरून उद्ध्वस्त प्रकरण वनाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवून निलंबन ची शिफारस सहपालकमंत्री ॲड.आशीष जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
📍अखेर वनपरिक्षेत्राधिकारी निलंबित ; वन कायद्याचा धाक दाखवून रस्ता नांगरणे भोवले.
एस.के.24 तास
सिरोंचा : आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील (क्र.३५३ डी) तमनदाला फाटा ते अमडेली हा एक किलोमीटरचा गिट्टी टाकून तयार केलेला रस्ता वनकायद्यावर बोट ठेवत चक्क ट्रॅक्टर लावून सिरोंचा वनविभागाने नांगरून उद्ध्वस्त केला होता.
माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर आढावा बैठकीत मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले होते. अखेर या प्रकरणात वनपरिक्षेत्राधिकारी सुधीर सुरपाम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
सिरोंचा तालुक्यातील तमनदाला फाटा ते अमडेली या एक किमी रस्त्याच्या दुरुस्तीकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया राबवली. कार्यारंभ आदेश घेऊन कंत्राटदाराने काम सुरू केले.पण वनकायद्याचे उल्लंघन होत असल्याचा दावा करून वनविभागाने ते अडवून ठेवले. जुलै २०२४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाकडे रस्ता कामास मंजुरीचा प्रस्ताव ठेवला. मात्र, वनविभागाचे त्रुटी काढून तो फेटाळला.