गडचिरोली पोलीसांनी विशेष मोहिम राबवित 8 अवैध दारु विक्रेत्यांविरुध्द केली कारवाई.
📍पोस्टे गडचिरोली व पोमके कारवाफा पथकांनी संयुक्तपणे केली कारवाई ; 8 वेगवेगळ्या ठिकाणावरुन एकुण 1,84,400/- रुपयांचा मुद्येमाल करण्यात आला जप्त.
एस.के.24 तास
धानोरा : (दि. 26/07/2025) गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी अवैध दारु विक्री करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन काल दिनांक 25/07/2025 रोजी पोस्टे गडचिरोली व पोमके कारवाफा येथील पोलीस पथकांनी संयुक्तपणे विशेष मोहिम राबवित 08 अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई केलेली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे कीे, मौजा नवेगाव, ता. धानोरा येथे अवैद्य दारु विक्री होत असल्याबाबतची माहिती पोमकें कारवाफा पोलीसांना मिळाली होती. यावरुन पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोली आणि पोमकें कारवाफा येथील पोलीस पथकांनी संयुक्तपणे अवैद्य दारु विक्रेत्यांविरुध्द मोहिम राबविली.
या दरम्यान पोमके कारवाफा येथील पोलीस पथकाने पायी अभियान राबवित मौजा नवेगाव येथे पोहचून सदर मोहिम राबविली.या मोहिमेदरम्यान संयुक्त पोलीस पथकांनी घेतलेल्या झडतीदरम्यान एकुण 99,400/- रुपयांचा देशी-विदेशी दारुचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच एकुण 85,000/- रुपये किंमतीची गावठी दारु आणि गावठी दारु निर्मितीचे हातभट्टी साहित्याचा नाश करण्यात आला आहे.
यावरुन सदर मोहिमे दरम्यान आरोपी नामे
1) प्रभुदास शिशु गावडे, वय,40 वर्ष
2) पंचफुला सुरेश नरोटे, वय,42 वर्ष
3) मनिषा केशव तुमरेटी वय,50 वर्ष
4) निलिमा वसंत तुमरेटी वय,35 वर्ष
5) दिलीप शिशु गावडे वय,32 वर्ष
6) अशोक तुळशिराम पदा वय,47 वर्ष
7) जैराम बुधाजी गावडे वय,58 वर्ष
8) परसुराम पांडुरंग तुमरेटी वय,44 वर्ष
सर्व रा.नवेगाव ता.धानोरा जि. गडचिरोली यांचे विरुध्द संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे गडचिरोली येथे कलम 65 (इ), 65 (एफ), महा.दा.का.अन्वये 08 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्रांचा पुढील तपास पोस्टे गडचिरोली पोलीसांकडुन करण्यात येत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक,गडचिरोली श्री. नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.एम.रमेश,अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री.सत्य साई कार्तिक,अपर पोलीस अधीक्षक,गडचिरोली (प्रशासन) श्री.गोकुल राज जी.तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी,कारवाफा
श्री.जगदिश पांडे व उपविभागीय पोलीस अधिकारी,गडचिरोली श्री. सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोली येथील पोनि.विनोद चव्हाण, पोउपनि.मारबोनवार, पोहवा/संजय पोल्लेलवार, पोहवा/प्रेमकुमार भगत,पोहवा/गुलाब कामतकर, पोमकें कारवाफाचे पोउपनि.संतोष कदम, मपोउपनि.सुनिता शिंदे व अंमलदार यांनी पार पाडली.