डम्पिंग यार्ड येथे तारांच्या जाळीत अडकलेल्या अजगरास जिवनदान.
एस.के.24 तास
चंद्रपूर : दिनांक 26 जुलै ला सायंकाळी 11 च्या दरम्यान डम्पिंग यार्ड अष्टभुजा येथे तेथील काम करणारे कामगारांना जाळीत अळकलेला अजगर साप दिसला तेथील कामगार मनिष उराडे यांनी हॅबिटेट कॉन्सर्वेशन सोसायटी चे सर्पमित्र साईनाथ चौधरी यांना फोन करून साप आल्याची माहिती दिली.
लगेच कसला हि वेळ न दवडता सरळ सर्पमित्र साईनाथ चौधरी व विशाल मडावी,रणजीत मडावी,अनिकेत वनकर घटना स्थळी पोहचले पाहणी केली.अजगर जातीचा साप 11 फूट लांबीचा होता.
जाळीत अडकलेल्या अजगरास जाळी कापुन त्या अजगरास कुठलीही इजा न होता त्याला पकडले व वनविभागात त्याची नोंद करून लोहारा जंगलात सुखरूप सोडण्यात आले.
त्यावेळी हेबिटेट कॉन्सर्वेशन सोसायटी चे सदस्य साईनाथ चौधरी,विशाल मडावी,रंजीत मडावी,अनिकेत वनकर इत्यादी उपस्थित होते.