अतिदुर्गम लिंगापूर टोला येथील नागरिकांसाठी गडचिरोली पोलीसांनी श्रमदानातून उभारला पूल 📍उपपोस्टे झिंगानूर पोलीसांकडून राबविण्यात आला समाजाभिमूख उपक्रम.

अतिदुर्गम लिंगापूर टोला येथील नागरिकांसाठी गडचिरोली पोलीसांनी श्रमदानातून उभारला पूल


📍उपपोस्टे झिंगानूर पोलीसांकडून राबविण्यात आला समाजाभिमूख उपक्रम.


एस.के.24 तास


गडचिरोली : दि.29/07/2025 सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून, जिल्ह्रात ब­याच नद्यांना पूर आल्याने वाहतूकीची समस्या निर्माण झालेली आहे. अशातच उपपोस्टे झिंगानूर हद्दीतील मौजा लिंगापूर टोला या गावाजवळील नाल्यामूळे वाहतूकीचा मार्ग बंद होत असल्याने नागरिकांना वाहतूकीसाठी अडचण निर्माण होत होती. यावरुन उपपोस्टे झिंगानूर व एसआरपीएफच्या जवानांनी नागरिकांच्या सुविधेसाठी श्रमदानातून पूलाची उभारणी केली आहे. 


सविस्तर वृत्त असे आहे की,पावसाळ्यामध्ये उपपोस्टे झिंगानूर हद्दीतील मौजा लिंगापूर टोला या छोट¬ा वस्तीच्या गावाजवळ असलेल्या नाल्यामध्ये असणा­या पाण्यामुळे वाहतूकीची समस्या निर्माण होऊन नेहमी इतर गावाशी संपर्क तुटत असतो.तसेच त्या दरम्यान वैद्यकीय मदत आणि शालेय विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. 


येथील नागरिकांच्या वाहतूकीच्या समस्येवर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक 28/07/2025 रोजी अभियानादरम्यान योग्य बंदोबस्त लावून उपपोस्टे झिंगानूर येथील पोलिस अधिकारी व अंमलदार तसेच एसआरपीएफच्या अंमलदारांनी श्रमदानातून एक नवीन पूल तयार केला आहे. 


त्यामुळे येथील नागरिकांचे पुलावरून येणे जाणे सुखकर झाले. तसेच गडचिरोली पोलीसांच्या या समाजाभिमूख कार्यामूळे येथील नागरिकांच्या मनात गडचिरोली पोलीस दलाबाबत एक आपुलकीची भावना निर्माण झाली असून पोलीस दल केवळ सुरक्षेसाठीच नव्हे, तर समाजाच्या विकासासाठीही कटिबद्ध आहे हे या उपक्रमाद्वारे अधोरेखित झाले आहे.


सदर उपक्रम हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा श्री. संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोस्टे झिंगानूरचे प्रभारी अधिकारी पोउपनि. अभिजीत घोरपडे, पोउपनि. ओंकार हेगडे, पोउपनि. अनिकेत खोपडे व अंमलदार तसेच एसआरपीएफच्या अंमलदारांनी राबविला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !