नागपंचमी निमित्त विशेष लेख...

नागपंचमी निमित्त विशेष लेख...


एस.के.24 तास


चंद्रपूर : नाग (सांप) चे आपल्या मानवी समाजावर खुप उपकार आहेत.त्यातुन उतराई (परतफेड) होण्या साठी आपन नागपंचमी साजरी करतो...

 

★ साप हा निसर्गातील अतिमहत्वाचा प्राणी असून, अन्नसाखळी मधे त्याची महत्वाची भुमिका आहे.एकूण धान्याच्या २५-३५ % धान्याची नासाडी करणाऱ्या उंदिर व घुशींचा तो कर्दनकाळ आहे.साप शेतकऱ्यांचाच नाही तर सर्व मानव जातीचा मीत्र आहे.


★ पक्षी व किटकांची निसर्गातील संख्या नियंत्रित ठेवण्याचे काम साप करतात.


★उंदरांपासून पसरणाऱ्या प्लेग,लेप्टोस्पायरोसीस इ. जिवघेण्या रोगांचे उगमस्थान साप नष्ट करतो.


★ महारोग,फुप्फुसाचे रोग यांसारख्या अनेक रोगांत वेदनाशामक व औषधी म्हणून सर्पविषाचा उपयोग होतो. 


सापाविषयी गैरसमज : - 


१)  नागास मारल्यास नागिन बदला घेते ? 


मिलनाचा काळ सोडला तर नाग नागिन कधिच एकत्र येत नाहित.त्यामुळे बदला घेण्याचा प्रश्नच येत नाही. सापाची स्मरणशक्ती विकसित नाही त्यामुळे त्यास स्मरणात राहत नाही.मारलेला साप हे नाग की नागिन हे ओळखता येत नाही कारण नागाचे जनन इंद्रिय हे शरिराच्या आंत असते व निसर्गात नागासारखे दिसणारे धुळनागिन व धामण इ.साप आहेत.


२) अजगर माणसाला गिळते ?

 ईतर सापांपेक्षा अजगर हा लांबी रुंदीला मोठा असल्यामुळे हा गैरसमज पसरला असावा,त्याचे खाद्य घुशी,ससे,हरीण,डुकराची पिल्ले,मगरींची पिल्ले हा आहे त्यात मानवाचा समावेश नाही.


३) नाग पुंगीवर डोलतो ?

नागाला किंवा इ.सापांना बाह्यकर्ण नसतात,त्यामुळे तो गाणे वा इ.ध्वनी ऐकू शकत नाही.तर तो हलणाऱ्या वस्तूवर हल्ला करण्याच्या पावित्र्यात ती वस्तू हलते तिकडे तो आकर्षित होतो.पुंगीच्या जागी रूमाल किंवा हाताची मूठ धरली तरी नाग तिकडे आकर्षित होतो.सापांत फक्त नाग जातिंचे साप फणा काढतात म्हणून गारुडी नागाचाच खेळ करतात.


४) ईच्छाधारी नाग असतो ?

नागाला १०० वर्षे झाली की तो ईच्छाधारी होतो व त्याला केस येतात असा समज आहे ,खरे तर नागच काय तर ईतर सापसुद्धा१००वर्षे जगल्याची उदाहरण नाही. *नाग हे फक्त २०-२५  वर्षेच जगू शकतात, तेही एखाद्या सर्पोद्यानातच,कारण निसर्गात सापाचे मुंगूस,घार,गरूड , मोर,ससाणा इ.अनेक शत्रू आहेत.


५) नागमणी असतो ?

 ही एक दंतकथा आहे.गारुडी काचेचे मणी,पाणी व रक्त शोषणारे दगड किंवा बेंजामिन चे तुकडे नागमणी म्हणून विकतात जर नागमणी असता तर त्याच्या प्रभावाने हे लोक धनाढ्य झाले असते व आज जगात गारुडी लोकच श्रीमंत राहीले असते.


६) नागाला केस असतात ?

साप हा सस्तन प्राणी नाही त्यामुळे त्याच्या अंगावर केस नसतात.गारुडी लोक नागाचे डोक्यावर चाकूने खाच पाडून त्यात कुत्रा,शेळीच्या शेपटीची केस रोवतात.


६) साप दूध पितो ?

दूध हे सस्तन प्राण्याचे पेयय आहे व साप हा सस्तन नाही .गारुड्यांकडं असणारे नाग हे खूप दिवस आधी पकडून त्यांचे विषारी सूळे काढून त्यांचे तोंड शिवून त्यास अंधार्या खोलीत काहीही खायला न देता ठेवले जाते. लक्षात ठेवा दूध हे सापाचे पेय नाही,ते पिल्याने सापास आतड्याची रोग होतात.भक्तीपोटी आपण नकळत एका जिवाची हत्या करत असतो.जर असे नाग घेउन कोणी गारुडी घरी आलाच तर तात्काळ जवळच्या वनविभाग वा सर्पमित्रास फोन करा.


७) मंत्राने विष उतरते ?

आपल्याकडील काही मोजके(चार/पाच) साप सोडले तर बहुसंख्य साप बिनविषारी असून त्यांच्या दंशाने इतर प्राण्यास काही होत नाही.दंश झालेली व्यक्ती मानसिक धक्यात असते त्यावर विषाचा प्रभाव नसतो व अशा वेळी मांत्रीकाचे फावते. 


साप वाचवा निसर्ग वाचवा...

आपणा सर्वांना नागपंचमीच्या व सर्पदंश जागरुकता दिनाच्या अनंत शुभेच्छा...

सर्पमित्र : - साईनाथ चौधरी                      

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !