एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी येथे शेतात ट्रॅक्टर खाली दाबून चालकाचा दुर्देवी मृत्यू.
एस.के.24 तास
एटापल्ली : येथील ट्रॅक्टर चालक अनिल शेंडे वय,38 वर्ष वाघेझरी ता.एटापल्ली,जि.गडचिरोली यांचे ट्रॅक्टरच्या अपघातात दुर्दैवी निधन झाले.ही घटना दिनांक, 26/07/2025 रोजी सकाळ च्या सुमारास घडली असून ट्रॅक्टर उलटून त्यांच्या अंगावर पडल्यामुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला.
अनिल शेंडे हे वाघेझरी गावातील रहिवासी होते आणि शेतीसाठी ट्रॅक्टर चालवण्याचे काम करत होते. अत्यंत मेहनती व नम्र स्वभावाचे अनिल हे गावात लोकप्रिय होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.गावात शोककळा पसरली असून,शेंडे कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकवटले आहेत.