श्री.गुरुदेव सेवा गंगामाता भजन मंडळाचा भजन - प्रबोधन उपक्रम : श्रावणात हरीनामाचा गजर
अमरदीप लोखंडे, सहसंपादक
ब्रम्हपुरी :२८/०७/२५ येथील बोंडेगाव वार्डातील श्री गुरुदेव सेवा गंगामाता भजन मंडळाचे भजन - प्रबोधन कार्यक्रम श्रावण महिन्यात आणि वर्षेभर सुरु असून या मंडळाने अनेक ठिकाणी भजन-प्रबोधन करण्याचा विडा उचल्याचे दिसते.
सदर मंडळ रजिस्टर असून या मंडळात विलास केशव करंबे हे अध्यक्ष आहेत तर मंदाबाई धनपाल करंबे ह्या उपाध्यक्ष,मुरलीधर गोमाजी करंबे हे कोषाध्यक्ष, ताराबाई जनार्धन राऊत ह्या सचिव म्हणून काम पाहतात. याशिवाय शाईमाला श्रीकांत पिलारे ह्या प्रचार प्रमुख,रेखाबाई दशरथ कुंभले ह्या भजन प्रमुख,प्रणाली प्रमोद बठे ह्या महिला प्रमुख आणि देवचंद बेदरे, रामेश्वर करंबे, नवलाजी तुपट,लिलाबाई करंबे,कुंदा प्रधान, निर्मला तुपट,चंद्रभागा बगमारे, जनार्दन राऊत, हरिदास करंबे, हरिश्चंद्र करंबे हे सदस्य आहेत.
सध्या सुरु झालेल्या श्रावण मासात या मंडळाने महिनाभर आपल्या गावातील मंदिरात भजन - प्रबोधन सुरु केले असून श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त, गणेशोत्सवात इतरांकडे ही मंडळी भजन कार्यक्रम करीत असतात. मंडळातील महिला आणि पुरुष एकत्र येऊन संतांची अभंग, राष्ट्रसंतांची भजने आणि संत एकनाथांच्या गौळणी तालासूरावर गातात.यातील अनेकांना अनेक भजने पाठ असून दिवसभर काम व रात्रो हरिनाम,असा पायंडा यांनी पाडलेला दिसतो.