सावली येथे जनसुरक्षा विधेयक विरोधात नियोजनात्मक बैठक.
📍बैठकीला सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन.
एस.के.24 तास
सावली : भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करणारे आणि जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू पाहणारे ,विशेष जनसुरक्षा विधेयक 2024,भाजप महायुतीच्या सरकारने नुकतेच विधिमंडळात बहुमताच्या जोरावर मंजूर करून,जनतेवर लादले आहे.
मुळातच जनसुरक्षा कायद्याच्या आडून,कष्टकरी, श्रमिक,आदिवासी,महिला,युवक,विद्यार्थी आणि समाजातील वंचित घटकासाठी जनसंघर्ष संघटित करणाऱ्या पुरोगामी व डाव्या विचारांच्या पक्ष व जनसंघटनांना हेतुपुरस्पर टार्गेट करण्याचा सरकारचा हेतू आहे.
तेव्हा या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकला विरोध करण्यासाठी पुरोगामी,डावे,समविचारी पक्ष व संघटनांची बैठक आयोजित केली आहे.
बैठकीस उपस्थित राहून जनसुरक्षा विधेयक विरोधी जनता तालुका सावली आव्हान केले आहे.
दिनांक,२९ जुलै 2025 रोज मंगळवार
वेळ,दुपारी - 2:00 वा.स्थळ :- पत्रकार भवन सावली
निमंत्रक - जनसुरक्षा विधेयक विरोधी जनता तालुका सावली.