चंद्रपूर मध्ये " ओयो " चा दुरूपयोग १५ हॉटेल व लॉज मालकांवर गुन्हे दाखल.

चंद्रपूर मध्ये " ओयो " चा दुरूपयोग १५ हॉटेल व लॉज मालकांवर गुन्हे दाखल.


एस.के.24 तास


चंद्रपूर : माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात ओयो हॉटेलचा मुद्दा चर्चेत आणला होता. त्यानंतर ओयो कंपनीचा बनावट ओयो ब्रॅण्ड व लोगो बनवून दुरूपयोग करत व्यवसाय करणाऱ्या शहरातील १५ हॉटेल व लॉजचे मालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, यातील बहुसंख्य ओयो हॉटेल बल्लारपूर बायपास मार्गावर,शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात आहेत.अहमदाबाद येथील ओयो हॉटेलचे नोडल अधिकारी मनोज पाटील यांच्या तक्रारी वरून ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई येथे नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री तथा बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेलच्या नावावर अवैध कामे सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.गृहमंत्रालयाने या अशा हॉटेलला परवानगी का दिली इथपासून तर तत्काळ कारवाई करावी अशीही मागणी केली होती.

हा मुद्दा चर्चेत असतांनाच अहमदाबाद येथील ओयो हॉटेलचे नोडल अधिकारी मनोज पाटील यांनी चंद्रपुरात ओयो ब्रॅण्ड आणि लोगोचा दुरूपयोग करून अनेकांनी हॉटेल थाटल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी शहरातील सर्वच हॉटेलची तपासणी सुरू केली आहे.
बनावट व खोटे ट्रेडमार्क, ओयो ब्रॉण्ड व लोगोचा गैरवापर करून ओयो बौध्दिक संपदा आणि भांडवली गुंतवणूक बेकायदेशीरपणे वापरली,ओयो ब्रॅण्डचा गैरवापर केला. ज्यामध्ये ओयो लोगो, डिझाईन घटक,कलाकृती आणि दर्शनी भागाचा समावेश आहे. या सर्व प्रकारामुळे ओयोच्या प्रतिष्ठेला नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपनीच्या अधिकृत तक्रारीनंतर ही कारवाई केली आहे.

१५ हॉटेल अनधिकृत व ओयो ब्रॅण्डचा दुरूपयोग करित असल्याचे निदर्शनास आले आहे. या पंधरा हॉटेलमध्ये हॉटेल रॉयल इन,बल्लारपूर रोड, हॉटेल ड्रिम स्टे,अष्टभूजा, वार्ड, हॉटेल फ्रेन्डस स्टे, बल्लारपूर रोड, लिओ स्टार हॉटेल, अष्टभूजा, हॉटेल आरआर इन,हॉटेल स्काय लाईन

हॉटेल अशोका लॉजिंग ॲन्ड बोर्डींग, हॉटेल आय.के.रिसेडेन्सी, विकास नगर, हॉटेल थ्री स्टार, बाबुपेठ, हॉटेल सिलिब्रेटी, बाबुपेठ, हॉटेल ग्रीन पार्क, बाबुपेठ, हॉटेल ७ डे, महाकाली मंदिर, हॉटेल सनराईज, जटपूरा गेट, रेयान हॉटेल ॲन्ड सेलिब्रेशन, विचोडा, हॉटेल फ्रेन्डशीप इन यांचा समावेश आहे.

ओयो हॉटेल ॲन्ड होम्स प्रा.लि. ही कंपनी अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत आहे. ओयो रूम्स हा ट्रेडमार्क व्यापार चिन्ह अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत आहे. ओयो हॉटेल हे बजेट लॉजिंग बुक करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित प्लॅटफॉर्म आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात ओयो कंपनीचा ओयो ब्रॅण्ड व लोगो बनावट बनवून त्याचा दुरूपयोग करून व्यवसाय करणारे हॉटेल लॉज मोठ्या प्रमाणावर असल्याच्या असंख्य तक्रारी कंपनीला प्राप्त झाल्या. 

या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गोपनीय भेट देवून माहिती घेतल्यानंतर शहरात १५ पेक्षा अधिक हॉटेल, लॉज असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही तक्रार केल्याचे कंपनीचे अधिकारी पाटील यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी सर्व १५ हॉटेल मालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निशीकांत रामटेके यांनी केली. 

गुन्हा दाखल केल्यानंतर मध्यरात्री छापा टाकून शहरातील सात ते आठ हॉटेलची तपासणी केली असता अनेक आक्षेपार्ह गोष्टी मिळून आल्या आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !