ब्रम्हपुरीत राज्यस्तरीय " पावसाच्या कविता " कविसंमेलन : उद्घाटक अशोक भैया तर संमेलनाध्यक्ष डॉ.धनराज खानोरकर
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२६/०७/२५ येथील अविष्कार साहित्य व सांस्कृतिक मंच आणि मराठी वाङ् मय मंडळ व संशोधन केंद्र,ने.हि.महाविद्यालय, ब्रह्मपुरीच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय 'पावसाच्या कविता' कविसंमेलनाचे आयोजन आज रविवार २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वा.ने.हि.महाविद्यालयाच्या स्व.हिरालालजी भैया सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक तथा ने.भै.हि.शिक्षण संस्थेचे सचिव मा.अशोकजी भैया यांच्या हस्ते होईल.या सत्रात अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्य.प्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर असतील.या राज्यस्तरीय कविसंमेलनाचे संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक कवी,लेखक तथा मराठी विभागप्रमुख डॉ.धनराज खानोरकर हे राहतील तर म.गा. महाविद्यालय,आरमोरी येथील साहित्यिक डॉ.नोमेश मेश्रामांची प्रमुख उपस्थिती असेल.
या कविसंमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून प्रवीण आडेकर (भद्रावती),रमेश बुरबुरे (वडसा),संजय गोडघाटे (नागपूर),सुरेश डांगे (चिमूर), गीता रायपुरे (चंद्रपूर),प्रीती जगझाप(बल्लारपूर),नूरजहा पठाण (गोंदिया),माणिक खोब्रागडे (नागपूर)आणि विनोद गहाणे (अर्जुनी) यांसारखे अनेक नामवंत कवी आपल्या रचना सादर करतील.
या कविसंमेलनात दुस-या सत्रात 'खुले कविसंमेलन' देखील आयोजित करण्यात आले आहे. ज्यात राज्यातील नवोदित तसेच अनुभवी कवींना आपली कविता सादर करण्याची संधी मिळेल.यासाठी आविष्कार मंचचे अध्यक्ष मंगेश जनबंधू ,सचिव गौतम राऊत व मंजूषा साखरकरांशी नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित बोरकर तर गौतम राऊत आभार मानतील.
अविष्कार साहित्य मंचचे सर्व पदाधिकार मंगेश जनबंधू, गौतम राऊत,मंजुषा साखरकर,भिमानंद मेश्राम, भाविक सुखदेवे, ललित बोरकर, छाया जांभुळे, वर्षा चौधरी,ज्योती नवघरे,शशी मदतकर,इंदू मुळे,सोनाली सहारे,देवेंद्र निकुरे,चैतन्य मातुरकर,कल्पना सूर्यवंशी, मंगेश गोवर्धन,अशोक शामकुळे, हिराकांत निहटे यांचा या आयोजनात सक्रिय सहभाग आहे.राज्यातील समस्त काव्यप्रेमींनी या साहित्य सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.