४० वर्षीय शिक्षिके चा १६ वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार ; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक.
एस.के.24 तास,
मुंबई : शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना दादर परिसरात घडली.१६ वर्षांच्या मुलावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४० वर्षीय शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली.तिच्याविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गक गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गेल्या वर्ष भरापासून ही शिक्षिका सदर विद्यार्थ्यासोबत बळजबरीने शरीर संबंध ठेवत होती.त्यामुळे तो तणावाखाली होता.कुटुंबियांनी त्याच्या वागण्यातील बदल दिसून आल्याने त्याला विश्वासात घेतले.
त्यावेळी त्याने घडलेला प्रकार सांगितले.या प्रकरणी आरोपी शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.आरोपी शिक्षिका विवाहीत असून तिला एका मुलगा आहे.डिसेंबर २०२३ मध्ये शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी या शिक्षिकेच्या संपर्कात आला होता.
जानेवारी २०२४ मध्ये या शिक्षिकेने पहिल्यांदा या विद्यार्थ्यावर अत्याचार केला.विद्यार्थ्याने सुरुवातीला दूर राहण्याचा प्रयत्न केला.पण ही शिक्षिका दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधत होती. त्यामुळे तो तणावाखाली होता.
त्याला गाडीत बसवून निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर अत्याचार केला.त्यानंतर त्याला काही औषधाच्या गोळ्याही खाण्यासाठी दिल्या होत्या.तसेच महिलेने मुलाला पंचतारांकीत हॉटेलमध्येही नेले होते. या सर्व प्रकारामुळे मुलाने कुटुंबियांशी व मित्र - मैत्रिणींशी बोलणे कमी केले होते.
घडलेला प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आला : -
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात विद्यार्थ्याच्या आई-वडिलांना याबाबत कळाले.बदनामीच्या भीतीने त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही.आई - वडील मुलाचा निकाल लागण्याची वाट पाहत होते.
आई - वडिलांना वाटले मुलगा १० वीत उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षिका आपल्या मुलाचा पाठलाग सोडेल.त्यानंतरही महिलेने पीडित मुलाला त्रास देणे सुरूच ठेवले.
मुलाची मानसिक स्थिती पाहून अखेर कुटुंबियांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शिक्षिका विरोधात नुकतीच तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षिकेविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह दाखल केला आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली. याप्रकरणी शिक्षिकेची चौकशी सुरू आहे.