देसाईगंज (वडसा) येथील नामांकित सराफा व्यापारी आणि त्याचा मित्र लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण ; अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दोघांनाही अटक. 📍न्यायालयात हजर केले असता 19 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी.

देसाईगंज (वडसा) येथील नामांकित सराफा व्यापारी आणि त्याचा मित्र लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दोघांनाही अटक.


📍न्यायालयात हजर केले असता 19 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी.


एस.के.24 तास


देसाईगंज (वडसा) देसाईगंज (वडसा) शहरातील एक नामांकित सराफा व्यापारी आणि त्याचा साथीदार त्यांच्या विरोधात एका २३ वर्षीय तरुणीने लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता.

सुनील पंडलिक बोके वय,48 वर्ष आणि अक्षय कुंदनवार वय,32 वर्ष अशी आरोपींची असून दोघे ही देसाईगंज (वडसा)चे रहिवासी आहेत.बोके याचे गांधी वॉर्ड परिसरात " राधा ज्वेलर्स " नावाचे सोन्या - चांदीचे दुकान आहे.या दुकानात कामाच्या निमित्ताने पीडित तरुणीचा संपर्क सुनील बोके याच्याशी आला.

यानंतर सुनीलने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी जवळीक साधली. तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने विविध ठिकाणी, कधी आपल्या राहत्या बंगल्यात,तर कधी स्वतःच्या कारमध्ये तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.

यावेळी त्याने पीडितेचे काही खासगी फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. सततच्या मानसिक त्रासामुळे आणि धमक्यांमुळे पीडिता दीर्घकाळ गप्प बसली.काही महिन्यांनी तिला समजले की, सुनीलचे आधीच लग्न झाले आहे.त्यामुळे तिने त्याच्याशी संबंध तोडले आणि मोबाईल क्रमांक ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला.

त्यानंतर,सुनील ने त्याचा मित्र अक्षय कुंदनवार याच्या मार्फत पीडितेवर पुन्हा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. अक्षयने तिच्याशी संपर्क साधून सुनीलशी पुन्हा बोलण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला.या सर्व त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने अखेर धाडस करून रविवारी दि.17 ऑगस्ट 2025 ला देसाईगंज (वडसा) पोलिस ठाण्यात सुनील बोके आणि अक्षय कुंदनवार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नीलोत्पल,उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलिसांनी 17 ऑगस्ट ला सुनील बोके ला नागपुर मध्ये मुसक्या आवळल्या तर अक्षय कुंदनवार यास देसाईगंजातूनच उचलले. 

दोघांनाही न्यायालयात हजर केले असता 19 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले,अशी माहिती पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी दिली.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !