पुराच्या पाण्यातून अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून न्यावा लागला मृतदेह.
एस.के.24 तास
नांदेड : राज्यात पावसाने हाहाकार उडवला आहे. त्यात नांदेड च्या मुखेडमध्ये तर ढगफुटी झाली आहे. या ढगफुटीचा फटका जवळपास 800 गावांना बसला आहे.एकीकडे पाऊस सुरू असताना मुखेड तालुक्यातील तारदडवाडी गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.त्यावेळी बाहेर पावसाने अगदी धुमाकुळ घातला होता.
अशा स्थितीत अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न या गावातल्या गावकऱ्यांना पडला होता. त्यांनी पाऊस ओसरण्याची वाट बघितली.पण पाऊस कमी होण्या ऐवजी वाढतच गेला.नद्या नाले दुथडी वाहू लागले.अशा स्थितीत काय करायचे असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता.
तारदडवाडी गावात कुणाचा मृत्यू झाला तर गावातील नाला ओलांडून उंचवठ्यावर अंत्यसंस्कार करावे लागलात.पण तो नालाही दुथडी वाहात होता. त्याला ही पुर आला होता. अशा स्थितीत तो नाला ओलांडून अंत्यसंस्कार करण्याशिवाय पर्याय नव्हता.त्यामुळे गावकऱ्यांनी हा नाला ओलांडण्याचा निर्णय घेतला.
गावकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने एकएक करत नाला पार केला.त्यावेळी अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घातल्याचं चित्र पाहायला मिळालं. या अंत्यविधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
दोरीच्या सहाय्याने गावकऱ्यांनी नाला पार केला. त्यात काही महिला ही होत्या.त्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी येत होतं.एक छोटीशी चुक झाली असती तर ती जिवावर बेतली असतील. तरीही गावकऱ्यांनी जीव धोक्यात घावून अंत्यसंस्कार केले आहे.
नांदेड च्या मुखेड तालुक्यातील तारदडवाडी गावातील ही घटना आहे.नांदेडच्या मुखेडमध्येच ढगफुटी झाली आहे. त्यामुळे जवळपास 800 गावांना त्याचा फटका बसला आहे. शिवाय अनेक ठिकाणी पुर स्थिती आहे. लोक पाण्यात अडकले आहेत. त्यांना काढण्याचं काम ही सुरू आहे.
नांदेड या जिल्ह्यात पूर स्थिती आहे. याचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्यातील मुखेडच्या विक्रमाबाद भागाला बसला आहे. इथं तब्बल 206 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. या ढगफूटीत पाच लोक बेपत्ता झाले आहे. त्याच बरोबर 150 जनावरं वाहून गेली आहेत. अनेक गावामध्ये लोकं अडकून पडले आहेत. NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांनी बचाव कार्यही सुरू केले आहे. मात्र तिथली परिस्थिती पाहाता सैन्याला ही पाचारण करण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं.