आलापल्ली येथील ग्रीनलँड इंग्लिश मिडियम स्कुल,येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा.
एस.के.24 तास
आलापल्ली : कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. लताताई रंगुवार यांचे हस्ते सकाळी ७:३० वाजता ध्वजारोहन करण्यात आले.स्वतंत्र दिनानिमित्य विद्यार्थ्यांद्वारे देशभक्ती गीतांवर नृत्य, देशभक्ति गीते,पथनाट्य इत्यादि कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आले, शिक्षकांनी आपल्या भाषणांद्वारे क्रांतिकारक आणि महापुरुषांच्या जीवन चरित्रांवर, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील घटनांवर विद्यार्थ्यांंना मोलाचे मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आले .यावेळी संस्थेचे अध्यक्ष, श्री.डॉ.जगन देवकर साहेब, सचिव सुरेशजी गड्डमवार,कोषाध्यक्ष,श्री मंगेशजी परसावार मुख्याध्यापक, श्री.जी.महेश,गावातील नागरिक, पालक,शिक्षक,व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.