प्रतिकूल हवामानादरम्यान 48 तासांपेक्षा अधिक चाललेल्या अभियानात ; गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान. 📍महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकूण 14 लाख रुपयांचे बक्षिस.

प्रतिकूल हवामानादरम्यान 48 तासांपेक्षा अधिक चाललेल्या अभियानात ; गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान.


📍महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकूण 14 लाख रुपयांचे बक्षिस.


एस.के.24 तास


भामरागड : महाराष्ट्र - नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात विध्वंसक कारवाया करुन घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने गडचिरोली विभागातील गट्टा दलम, कंपनी क्र. 10 व इतर दलमचे काही माओवादी एकत्र येऊन दबा धरुन बसले आहेत.


अशा गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरुन मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.एम.रमेश यांचे नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या 20 तुकड्या व सीआरपीएफ क्यु.ए.टी. च्या 02 तुकड्या दिनांक 25/08/2025 रोजी तातडीने सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबविणेकामी रवाना करण्यात आल्या होत्या.


अवघड जंगल परिसर व प्रतिकूल हवामानाचा सामना करत सतत सुरु असलेल्या पावसादरम्यान सलग दोन दिवस अभियान राबवून पोलीस पथके सदर जंगल परिसरात पोहचली. काल दिनांक 27/08/2025 रोजी सकाळी पोलीस पथके शोध अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरु केला. 


त्यावेळी पोलीसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता, माओवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला.पोलीसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.  


 सुमारे आठ तास चाललेल्या चकमकी नंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता,घटनास्थळावर 01 पुरुष व 03 महिला असे एकुण 04 माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले.सदर चारही मृतक माओवाद्यांची ओळख पटली असून ती खालीलप्रमाणे आहे.



1.) नाव - मालु पदा,वय 41 वर्ष रा.बुर्गी (रेंगावाही) ता. बेटीया,जि. कांकेर (छ.ग.)

दलमचे नाव - कंपनी क्र. 10

पद – पीपीसीएम

बक्षिस – 06 लाख रुपये

कार्यकाळात दाखल गुन्हे - चकमक – 05, खून – 01, जाळपोळ – 01, इतर – 01 - एकुण – 08


2) नाव - क्रांती ऊर्फ जमुना रैनु हलामी, वय 32 वर्ष,रा.बोधीनटोला, तह. धानोरा,जि.गडचिरोली

दलमचे नाव - कंपनी क्र. 10

पद – कंपनी सदस्य 

बक्षिस – 04 लाख रुपये

कार्यकाळात दाखल गुन्हे - चकमक – 13, खून – 06, जाळपोळ – 03, इतर – 05 - एकुण – 27


3) नाव - ज्योती कुंजाम, वय 27 वर्ष रा.बस्तर एरीया, राज्य छत्तीसगड

दलमचे नाव - अहेरी दलम

पद – दलम सदस्य 

बक्षिस – 02 लाख रुपये

कार्यकाळात दाखल गुन्हे - चकमक – 07, खून – 01 – एकूण – 08


4) नाव - मंगी मडकाम, वय 22 वर्ष रा.बस्तर एरीया, राज्य छत्तीसगड

दलमचे नाव – गट्टा दलम

पद – दलम सदस्य 

बक्षिस – 02 लाख रुपये

कार्यकाळात दाखल गुन्हे - चकमक – 02, इतर – 01 – एकूण – 03

एकूण बक्षिस – 14 लाख रुपये


प्त अग्निशस्त्रे


1. SLR रायफल - 01

2. INSAS रायफल – 02

3. .303 रायफल – 01

4. जिवंत काडतूस  – 92

5. वॉकी टॉकी  – 03


वरील मृतक माओवाद्यांवर चकमक, जाळपोळ व खुन इ. वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यासोबतच सदर घटनास्थळावरुन एक एस.एल.आर., दोन इन्सास व एक .303 रायफल असे एकूण 04 अग्निशस्त्र, एकूण 92 नग जिवंत काडतूस, 03 वॉकीटॉकी, माओवादी साहित्य व इतर दैनंदिन वापराचे साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. 

        

सदरचे माओवादविरोधी अभियान अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ.श्री.छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ श्री.अजय कुमार शर्मा, 


पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, उप-कमांडंट सिआरपीएफ इंट श्री.सुमित वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.एम.रमेश यांच्या नेतृत्वात सी-60 आणि सिआरपीएफ क्यु.ए.टी. च्या जवानांनी यशस्वीपणे पार पाडले. 


सन 2021 पासून गेल्या आजपावेतो गडचिरोली पोलीसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 91 कट्टर माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून, 128 माओवाद्यांना अटक करण्यात आले आहे व 75 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सदर खडतर अभियानादरम्यान सी-60 व सिआरपीएफच्या जवानांनी दाखविलेल्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे. 


सदर अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि सर्व जवानांना सुखरूप परत आणण्यासाठी संपूर्ण अभियानाची देखरेख करुन अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली श्री. गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री.विशाल नागरगोजे


सी-60 प्राणहिताचे प्रभारी अधिकारी सपोनि. राहुल देवडे यांच्यासह सी-60 गडचिरोली आणि प्राणहिताचे इतर अधिकारी व अंमलदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सदर भागात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून पून्हा एकदा सर्व माओवाद्यांना आत्मसमर्पण करुन आपले जीवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !