धारिवाल कंपनी कडून शेतकऱ्याचे प्रशिक्षण.
एस.के.24 तास
चंद्रपूर : वढा - धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड,चंद्रपूर आणि विकासगंगा समाजसेवी संस्था,घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती द्वारे पर्यावरणपूरक शाश्वत शेती हा प्रकल्प पांढरकवडा,वढा,धानोरा, अंतूर्ला, येरुर, सोनेगाव, शेनगाव, मोरवा, ताडाळी, चारगाव, या गावामध्ये प्रकल्प राबविण्यात येत आहे.
मा.देवेश कुमार ( मुख्यमहाप्रबंधक धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सेंद्रिय शेतीबद्दल शेतकऱ्यांना दिशा मिळावी व जागरूकता निर्माण व्हावी वढा या गावांमध्ये शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा.श्री विजय दादा कडू यांनी शेतकऱ्यांना पंचतत्त्वे याचा दाखला देत आपली जमीन शाश्वत व पर्यावरणपूरक कशी ठेवता येईल यावर भर द्यावा.आणि आपले उत्पन्न कसे वाढवता येण्यासाठी नवीन तंत्रज्ञानांचा वापर करावा असे सांगितले.
पाणी अडवा पाणी जिरवा या म्हणी प्रमाणे आपल्या शेतातील पाणी बांधबंदिस्तेने व शोष खड्ड्याच्या सहायाने पाणी मुरवावे, आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्याच्या दृष्टीने काम करण्यात यावे असे शेतकऱ्यांना मा.श्री रंजीत बोबडे सर ( अध्यक्ष विकासगंगा समाजसेवी संस्था, घाटंजी.) यांनी मार्गदर्शन केले.
मा.श्री अमित गाडबैल (सचिव विकासगंगा समाजसेवी संस्था घाटंजी.) यांनी सप्तपदी चा दाखला देत आपल्या कापूस पिकाचे व्यवस्थापन केल्याने जमिनीत सुपीकता व शाश्वत शेती टिकून राहून निश्चितच उत्पादनामध्ये वाढ होईल.असे सांगण्यात आले.
मा.श्री अनिश नायर सर( मुख्य व्यवस्थापक धारीवाल) यांनी शेतकऱ्यांना धारिवाल कंपनी कडून शेतकऱ्याच्या हितासाठी आपण पूर्णपने सहकार्य करू असे आश्वासन दिले.
मा श्री अनिकेत माने ( तालुका कृषी अधिकारी चंद्रपूर) कृषी विभागातील फळबाग, यांत्रिकीकरण, ठिबक योजना योजना इत्यादी बद्दल माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनाचा लाभ घ्यावा असे सांगण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून श्री किशोर वरारकर (सरपंच वढा).श्री संचित रावत (धारिवाल कंपनी).श्री विजय बल्की (माजी सभापती चंद्रपूर) श्री.दातारकर सर ( कृषी पर्येवक्षक चंद्रपूर), श्री.साईनाथ खेकारे (तालुका मंडळ अधिकारी),श्री विजय कुटे (कृषी सहाय्यक चंद्रपूर),कृषींसखी
ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांची उत्स्फूर्त उपस्थिती कार्यक्रमात पाहायला मिळाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन धनंजय दळवी यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मिथुन कलसार,पूजा चतुर, यांनी विशेष मेहनत घेतली.
या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यात या चळवळीला आणखी बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
तसेच गावातील शिक्षकवृंद,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कृषी सखी, बालसखी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांची उत्स्फूर्त उपस्थिती कार्यक्रमात पाहायला मिळाली.