गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोस्टे वडसा येथे आरोग्य शिबिर संपन्न. 📍रोटरी क्लब नागपूर, तालुका आरोग्य विभाग,देसाईगंज आणि राज्य राखीव पोलीस बल यांच्या संयुक्त विद्यमाने वडसा पोलीसांकडून राबविण्यात आला उपक्रम.

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोस्टे वडसा येथे आरोग्य शिबिर संपन्न. 


📍रोटरी क्लब नागपूर, तालुका आरोग्य विभाग,देसाईगंज आणि राज्य राखीव पोलीस बल यांच्या संयुक्त विद्यमाने वडसा पोलीसांकडून राबविण्यात आला उपक्रम.


एस.के.24 तास


देसाईगंज (वडसा) : गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्ह्यातील नागरिकांसाठी वेळोवेळी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. जिल्ह्रामधील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत देखील आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध आरोग्य मेळावे आयोजित केले जात असतात. 

याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोस्टे वडसा येथे गडचिरोली पोलीस दल,रोटरी क्लब नागपूर, तालुका आरोग्य विभाग,देसाईगंज आणि राज्य राखीव पोलीस बल यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


पावसाळ्यामध्ये बदलत असलेल्या हवामानामूळे तसेच दूषित अन्न व जेवणामूळे पसरणा­या आजारांचे प्रमाण अधिक असते. सदरबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करुन नागरिकांना विविध आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री.नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 


या शिबिरामध्ये रोटरी क्लब,नागपूरच्या प्रमुख डॉ.रश्मी शाहू,डॉ.गिरीश छाबराणी यांचे नेतृत्वात प्रख्यात ह्मदयरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, दंत चिकित्सक, नेत्ररोग तज्ञ, इतर आजारावरील तज्ञ वैद्यकीय अधिकारी तसेच सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री.गहाणे,श्री.सहारे यांच्या उपस्थितीत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

सदर शिबिराचे उद्घाटन आरमोरी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले. सदर आयोजित शिबिरादरम्यान पोस्टे देसाईगंज व परिसरातील सुमारे 547 नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करून आवश्यकतेनूसार नागरिकांना औषधे उपलब्ध करुन देण्यात आली. 

तसेच एकूण 41 नागरिकांना आवश्यकतेनूसार विविध रुग्णालयांच्या ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी शिफारस केलेली आहे.एकूण 31 नागरिकांचे वंध्यत्व निवारणासाठी तज्ञ वैद्यकीय अधिका­यांकडे शिफारस करण्यात आलेली आहे. यासोबतच एकूण 125 नागरिकांची नेत्र तपासणी करुन त्यांना चष्म्याचे वाटप करण्यात आले आहे. 

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सन 2021 पासून आजपावेतो एकूण 152 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून एकूण 37,770 नागरिकांची आरोग्य तपासणी केलेली आहे.

तसेच एकूण 05 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून एकूण 3,119 युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. यासोबतच ऑपरेशन रोशनीच्या माध्यमातून एकूण 8,498 पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करुन एकूण 1,144 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे.

सदर शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, रा.रा.पो.बल गट क्र. 13 च्या समादेशक श्रीमती भाग्यश्री नवटाके, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी.तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री.रवींद्र भोसले,सहाय्यक समादेशक श्री.ललित मिश्रा 

श्री.मारोती लांबेवार डि.वाय.एस.पि.यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंजचे प्रभारी अधिकारी पोनि.श्री.अजय जगताप यांच्या नेतृत्वात सपोनि. श्री मनिष गोडबोले,पोउपनि.श्री देरकर व अंमलदार तसेच रा.रा.पो. बल गट क्र 13,विसोरा येथील पोनि.श्री.पवार, श्री.मोरला यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !