विविध दाखल्यांचे वाटप करून महसूल सप्ताह दिन साजरा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथे महसूल सप्ताह महसूल विभाग ब्रह्मपुरी च्या वतीने अ-हेरनवरगांव साजा मंडळाधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आयोजित केला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.दामिनी चौधरी सरपंचा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.यावेळी ब्रह्मपुरीचे नायब तहसीलदार प्रशांत धकाते,अ-हेरनवरगांव साजा मंडलाधिकारी बिटेश्वर येरमे, मुख्याध्यापक तुलकाने,पोलीस पाटील अकुल राऊत, गोवर्धन बागडे,अभियानाचे आयोजक तलाठी संजय मटाले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या अभियानात सातबारा - २५,नमुना आठ - १४,नकाशे - १८,उत्पन्न अहवाल - २१,फेरफार - १२
संजय गांधी निराधार - ०१ एकूण ९१ दाखल्यांचे वाटप उपस्थित शेतकरी, विद्यार्थी, संजय गांधी निराधार यांना पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन पाथोडे शिक्षक यांनी तर आभार गोवर्धन बागडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साजा मंडळाधिकारी येरमे, तलाठी संजय मटाले व साजा मंडळातील तलाठी, ब्रह्मपुरी महसूल विभाग कर्मचारी यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले.