गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि इतर एचपीव्ही - संबंधित रोग रोखण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल. 📍हेडरी येथील एलकेएएम रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि इतर एचपीव्ही - संबंधित रोग रोखण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल.


📍हेडरी येथील एलकेएएम रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ.


एस.के.24 तास


एटापल्ली : लॉयड्स काली अम्मल मेमोरियल  हॉस्पिटलने शनिवारी जागतिक आदिवासी दिनानिमित्त ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) मुळे होणार्‍या कर्करोगांपासून समुदायाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने एचपीव्ही लसीकरणाची विशेष मोहीम सुरु केली.


मोहिमेचा उद्घाटन कार्यक्रम हेडरी येथील एलकेएएम हॉस्पिटल मध्ये आयोजित करण्यात आला होता. लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशन (एलआयएफ) च्या संचालक कीर्ती कृष्णा आणि प्रकल्प संचालक  सुनीता मेहता यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला. वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाल रॉय


बालरोगतज्ज्ञ डॉ.आकांश रेड्डी, वरिष्ठ नर्सिंग अधिकारी आणि प्रभारी  कविता दुर्गम हे ह्याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. लसीकरण मोहिमेत ९ ते ११ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थीनी आणि  लॉयड्स  मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या महिला कर्मचार्‍यांना पहिला डोस देण्यात आला. 


कीर्ती कृष्णा आणि डॉ.गोपाल रॉय यांनी उपस्थितांना ह्याप्रसंगी संबोधित करताना लसीकरणाचे महत्त्व आणि सामुदायिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी त्याचे दीर्घकालीन फायदे यावर प्रकाश टाकला. 

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि इतर एचपीव्ही-संबंधित रोग रोखण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले.

लॉयड्स राज विद्या निकेतन (LRVN) टीमने एलएमईएल चे व्यवस्थापकीय संचालक आणि एलआरव्हीएनचे अध्यक्ष बी.प्रभाकरन आणि कीर्ती कृष्णा यांचे मुलींना मोफत एचपीव्ही लसीकरण देण्याच्या विचारशील 

आणि प्रभावी उपक्रमाबद्दल मनापासून आभार मानले. राखी सणाच्या निमित्ताने हा उपक्रम एक वैज्ञानिक आणि चिरस्थायी " संरक्षणाचा धागा " म्हणून काम करतो जो मुलींना संभाव्य आरोग्य धोक्यांपासून संरक्षण देतो आणि त्यांना आत्मविश्वासाने भविष्यात पाऊल ठेवण्यास सक्षम करतो असे सांगण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !