माजी विद्यार्थ्यांने केला आपल्या आवडत्या शिक्षकांचा सत्कार.
एस.के.24 तास
नागभीड : विद्यार्थी जडणघडणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा असून शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनातूनच मानवी जीवन यशस्वी होत असते. लहानपणापासून स्वतः मोलमजुरी करून प्रसंगी बस स्टैंड वर पाण्याची पाऊच विकून पोट भरणारा विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीतून व जीवनमूल्य मार्गदर्शनातून स्वतःचे व्यक्तिमत्त्व साकारले.
आज स्वतंत्र व्यावसायिक असल्याचा अभिमान उराशी ठेवून आपले आवडते शिक्षक श्री.एस.टी.कोरे सर यांना प्राचार्य पदी विराजमान झालेले पाहून त्याला अतिशय आनंद झाला.आणि त्याने प्रत्यक्षात शाळेत येऊन श्री एस. टी .कोरे सर यांचा शाल ,पुष्पगुच्छ आणि पेढा भरवून सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसमोर सत्कार केला.
वर्ग पाचवी ते बारावीपर्यंत जनता ब.उ.मा.विद्यालय तथा महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी शाहरुख शेख यांनी एस.टी. कोरे सर यांचा प्राचार्य म्हणून तर सी.यु.रोहणकर यांचा उपप्राचार्य या दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला.शिक्षकांची मदत वेळोवेळी लाभली असल्याचे तसेच आपल्याला प्रसंगी जीवनावश्यक साहित्य वेळोवेळी पुरवून माझ्या जीवनाचे ध्येय गाठण्यास एस.टी. कोरे सर यांनी मदत केली असल्याचे सांगत गहिवरून शाहरुख शेख यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
शाहरुख शेख मराठी माध्यमाचा विद्यार्थी असून शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करणारा,शिस्तबद्ध,नियमित विद्यार्थी असल्याने शिक्षक प्रिय विद्यार्थी म्हणून निवड झाल्याचे श्री.एस.टी.कोरे सर यांनी सांगितले.जनता विद्यालयातील विद्यार्थी प्रेमी शिक्षक विद्यार्थ्यांचे गुण कौशल्य घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता नेहमीच उचित मार्गदर्शन करीत असतात.
एका माजी विद्यार्थ्याने आपला केलेला सन्मान हा विद्यार्थी प्रिय शिक्षकाचे उदाहरण असल्याचे परिसरातील नागरीकराकडून बोलले जाते.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन एम. आर.बोरकर सर यांनी केले तर आभार एस.डी.सयाम यांनी केले. याबद्दल सर्व शिक्षकांनी शाहरुखचे कौतुक केले.