दार्शनीक कवायतीने गावकरी भारावून गेले.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१६/०८/२५ ७९ वा स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,विकास विद्यालय ,अ-हेरनवरगांव व गावातील ध्वजारोहण आटोपल्यानंतर शेवटी ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात ध्वजारोहण करण्यात येऊन समारोपीय कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी तसेच गावकऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी शासनाच्या परिपत्रकानुसार विकास विद्यालय व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी संगीतबद्ध संगीताच्या तालावर दार्शनीक कवायती यावेळी दाखविल्या.त्यांच्या दर्शनी कवायती पाहून गावकरी भारावून गेले.
या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत सरपंचा दामिनी चौधरी,सचिव रतिराम चौधरी, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक धोटे, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक तुलकाने, माजी सैनिक सुभाष ठेंगरे,अंगणवाडी सेविका ,मदतनीस आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी,आशा वर्कर, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.