तोल जाऊन तलावात बुडून इसमाचा मृत्यू.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१६/०८/२५ ब्रम्हपुरी तालुक्यापासून ०६ की.मी.अंतरावर असलेल्या अ-हेरनवरगांव येथील रहिवासी अरुण तुळशीराम ठेंगरे वय ५३ वर्ष हा तलावात बुडून मृत्यू पावल्याची घटना दि.१५ऑगष्ट रोजी उघडकीस आली .
प्राप्त माहितीनुसार सदर व्यक्ती हा दि.१४ ऑगष्ट ला पहाटे ४-०० वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे शौचास गावाबाहेरील तलावाच्या पाळीवर गेला होता. मात्र दिवसभर घरी न आल्याने जिकडे तिकडे शोधाशोध घेण्यात आला मात्र अरुण चा शोध लागला नाही.
दि.१५ ऑगस्ट ला सकाळी ०६ ते ०७च्या सुमारास गावाजवळील तलावात त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने गावात एकच खळबळ माजली. गावात मृतदेह तलावात तरंगत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली असता गावकऱ्यांनी झेंडावंदन सोडून मृतदेह पाहण्यासाठी एकच गर्दी तळ्यावर केली.
अ-हेरनवरगांव चे पोलीस पाटील अकुल राऊत यांनी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली असता अ-हेरनवरगांव बिट जमादार अरुण पिसे यांनी आपल्या टीम सह घटनास्थळी येऊन मोका चौकशी केली आणि सदर मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आणि उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले.
मृतक अरुण हा घरचा कर्ता व्यक्ती असल्याने घरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या पश्चात पत्नी,मुली०४ व बराच मोठा आप्त परिवार आहे.