सावेला ते पोटेगांव रोडची झाली चाळण ; संबंधित अधिकारी करतात जाणीवपूर्वक दुर्लक्ष परिसरातील नागरिकांनचा चा आरोप.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यामध्ये पोटेगांव हे गांव 32 कि.मी.अंतर असून परिसरातील 25 गावे जोडलेले आहेत.व पावीमुरांडा ईलाखा व कोटमी कसनसुर ईलाखा येथिल लोकांना गडचिरोली येण - जाण करण्यासाठी पोटेगांव वरूनच जावे लागतो.
करिता या या वर्षी खुप पाऊसामुळे सावेला ते पोटेगांव रोड वरती मोठ - मोठे खड्डे पडलेले असुन फोर व्हिलर किंवा दुचाकी वाहणाने ये-जा करणाऱ्या लोकांना जिव मुठीत ठेवून जीवघेणा प्रवास करावा लागतो.
पोटेगांव,सावेला,गुरवळा ते गडचिरोली हे महामार्ग मुख्य असून या मार्गांनी रोज परिसरातील लोक शालेय विध्यार्थी गडचिरोली येथे कामाकाजासाठी मुख्यालयी येत असतात.रस्ते बांधकाम विभाग या रस्त्याची दुरुस्ती करावी.
सावेला ते पोटेगांव पर्यंत रोडचे खड्डे भरणा करुण नव्याणे रिपेरिंग करुण रोडची रुंदीकरण करण्यात यावी.अन्यता सदर रोड कामाची सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्यात येईल.
असा इशारा वंचित बहुजन आघाडी गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नरोटे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुंजमकर व परिसरातील नागरिकांनी परिसरातील नागरिक करीत आहेत.