भामरागड तालुक्यातील सीपनपल्ली मार्गे जोनावाही मुख्याध्यापकाचा दुर्दैवाने नाल्यात वाहून त्यांचा मृत्यू.
एस.के.24 तास
भामरागड : दिनांक,19 ऑगस्ट 2025 रोजी तालुका भामरागडातील मनेराजाराम महसूल मंडळांतर्गत मौजा सीपनपल्ली येथील नाल्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला.याबाबतची माहिती कोतवाल दिनेश मडावी यांनी दिली.
या संदर्भात महसूल मंडळांतर्गत बेपत्ता झालेल्या इसमांची माहिती घेतली असता, मौजा जोनावाही येथील शिक्षक वसंत सोमा तलांडे वय,45 वर्ष हे बेपत्ता असल्याचे समोर आले.त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांना घटनास्थळी बोलावण्यात आले.त्यांनी मृतदेह हा वसंत सोमा तलांडे यांचा असल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, वसंत तलांडे यांनी आपल्या पत्नीला फोनवरून " मी पेरमीली वरून निघालो " असे सांगितले होते.ते सीपनपल्ली मार्गे जोनावाही आपल्या घरी जात असताना दुर्दैवाने नाल्यात वाहून त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
मृतक वसंत सोमा तलांडे हे नोकरीने शिक्षक असून, त्यांचा रंग सावळा होता.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.