हजारो कोटी रुपयाची देयके शासनाकडे थकित पैसे द्या ; कंञाटदार शासन विरूध्द आक्रमक.
📍प्रलंबित देयके मिळवण्यासाठी 25 ऑगस्ट ला मुख्य अभियंता नागपूर यांच्या कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन.
एस.के.24 तास
गडचिरोली : कंञाटदाचे प्रलंबित देयके व विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी 25 ऑगस्ट ला मुख्य अभियंता नागपूर यांच्या कार्यालयासमोर ठि 11.00 वाजता भिकमागो आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष नितीन डहाके यांनी आज सा.बा.विभागाच्या विश्रामगृहा झालेल्या बैठकि दरम्यान सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत झालेल्या विविध योजनेच्या विकास कामाची विभागाकडिल राज्यातील सर्व कंत्राटदाराची प्रलंबित देयके देण्यासाठी निधी शासनाने 10 दिवसात उपलब्ध करून द्यावा, राज्यातील सर्व विभागाची नविन प्रस्तावित कामे कंत्राटदाराची प्रलंबित देयके पूर्ण होईपर्यंत काढू नयेत.तसेच त्यांच्या निविदा प्रक्रिया राबवू नयेत, सर्व विभागाच्या प्रस्तावित नवीन कामांना शासनाच्या अर्थ विभागाकडून 50% निधिची तरतूद केल्याशिवाय व मंजूरी मिळ्याल्याशिवाय पुढील कोणतीही निविदा प्रक्रिया सुरू करू नये.
कंत्राटदराचे थकीत देयके तातडीने निधि मंजूर करावा. वेळोवेळी राज्यातील विदर्भातील कंत्राटदार संघटनेने निवेदन , नारेबाजी, निदर्शने केली पण शासनाने कुठल्याहि प्रकारची दखल घेतली नाही , म्हणून विदर्भातील कंत्राटदार आक्रमक झाले आहेत व मूख्य अभियंता नागपूर यांच्या कार्यालयासमोर भिकमागो आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
कंत्राटदारांचा आरोप आहे की मार्च २०२५ मध्ये फक्त ५% इतकाच निधी वितरित करण्यात आला असून त्यानंतर आजतागायत एकही रुपया मिळालेला नाही.अनेक निवेदनं, आंदोलनं करूनही शासनाने ठोस उपाययोजना केली नसल्याने कंत्राटदारांना रस्त्यावर उतरावे लागत आहे.
या आंदोलनात नागपूर,गडचिरोली,चंद्रपूर,वर्धा, यवतमाळ,वाशिम, गोंदिया,भंडारा,अमरावती,बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेकडो कंत्राटदारांचा सहभागी होणार आहे. “ आता तरी शासनाने कंत्राटदारांना न्याय द्यावा,
कर्जाची रक्कम कशी देणार : -
ज्यांच्याकडे कोणतीही काम करता येत नाही, ते लोक भीक मागतात, आम्ही काम केलेत, पण पैसे मिळाले नाहीत, खिशातले पैसे कामावर खर्च केले. त्यानंतर व्याजाने कर्जाची रक्कम घेतली.
काम केल्यावर पैसे मिळतील त्या रकमेतून सर्व हिशोब करायचा आहे.पण, बिलाची देयके अद्याप हातात मिळाली नाहीत,त्यामुळे कंत्राटदार कर्जबाजारी झालेले आहे व आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे आता भीक मागितल्याशिवाय पर्याय नाही,कित्येक महिने होऊनही बिलाचे देयके मिळाली नाहित त्यामुळे कंत्राटदार संतप्त झालेत. आणखी किती दिवस वाट बघायची असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
10 दिवसात प्रलंबित देयके मंजूर न झाल्यास राज्यातील काम बंद व संघर्ष अधिक तीव्र केला जाईल असा इशारा यावेळी संघटनेतर्फे देण्यात आला.
यावेळी उपस्थित विदर्भ कंत्राटदार संघटनेचे अजय तुम्हावार,भूषण समर्थ,मंगेश देशमुख,प्रणय खुणे,मनोज पवार, राहुल निलमवार, सागर निंबाडकर, रणछोड कलंत्री, लीलाधर भरडकर,निलकंठ गावडे,श्री हुड्डा, प्रसाद कवाशे उपस्थित होते.