सावली तालुक्यात एकूण ७० कृषी केंद्र असून आतापर्यंत २५ कृषी केंद्राची झाडाझडती.
📍सावली तालुक्यात ९ कृषी केंद्रांना नोटीस,तपासणीला वेग.
एस.के.24 तास
सावली : शेतीचा हंगाम असल्याने शेतकर्यांना शेतीसाठी आवश्यक निविष्ठा बियाणे,खते तर प्रासंगिक निविष्ठा कीटकनाशके तन नाशके इत्यादी मिळण्याचे स्थानिक विश्वासार्ह स्त्रोत हे परिसरातील कृषी केंद्र असतात,शेतकर्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत निविष्ठा गुणवत्ता,निविष्ठा किमती,साठेबाजी व लिंकिंग बाबत काही ठिकाणी शेतकर्यांची निविष्ठा पुरवठा धारकांकडून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर बाबी टाळण्याच्या अनुषंगाने व शेतकर्यांना दर्जेदार निविष्ठा योग्य वेळी योग्य दरात मिळावे यासाठी कृषी विभागाने कृषी केंद्र तपासण्या अभियान स्वरूपात सुरू केल्या असून दोषी आढळल्यास कार्यवाही करण्यात येत आहे.
सावली तालुक्यात एकूण ७० कृषी केंद्र असून आतापर्यंत २५ कृषी केंद्राची झाडाझडती घेण्यात आली त्यापैकी ९ कृषी केंद्रांना सुधारणा करने करिता नोटीस देण्यात आले आहे. एका कृषी केंद्रावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आणि अशी कार्यवाही यापुढे निरंतर सुरू राहणार असल्याची माहिती तालुका कृषी निविष्ठा निरीक्षक दिनेशपानसे यांनी दिली आहे.
कृषी केंद्र संचालक यांनी नोंदणी प्रमाणपत्राचे अटी व शर्थी तथा कायदेशीर नियमाचे पालन करून शेतकर्यांना निविष्ठा पुरवठा करावे.