श्री,शशांक भास्कर कुलसंगे पोलीस पाटील चुरचुरा माल राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.
एस.के.24 तास
गडचिरोली : नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम भारत सरकार द्वारा सन 2025-26 मध्ये देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील राजश्री शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार इटॉस इम्पिरिअल आकाश मोगरा हॉलमध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री,शशांक भास्कर कुलसंगे पोलीस पाटील चुरचुरा माल यांना प्रदान करण्यात आला. श्री,शशांक भास्कर कुलसंगे हे पोलीस पाटील म्हणून गेल्या दोन - तीन वर्षापासून धुरा सांभाळत आहेत.
चुरचुरा माल सारख्या ग्रामीण भागात सामाजिक कार्य तसेच शिक्षण क्षेत्रातील अनुकरणीय कार्य, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचा प्रसार, सामाजिक दृष्टिकोन आणि राष्ट्र उभारणी यांसारख्या शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक कामे,सार्वजनिक कामे, शांतता व सुव्यवस्था, संविधानिक मूल्य रुजवणे यासारखी कामे केल्याने छत्रपती राजश्री शाहू महाराज राष्ट्रीय समाज भूषण 2025-26 पुरस्काराने त्यांना नुकतेच गौरविण्यात आले.
26 जुलै रोजी आयोजित पुरस्कार समारंभात माजी खा. डॉ.हिना गावित, निवृत्त पोलीस उपअधीक्षक आत्माराम प्रधान, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शिक्षणाधिकारी बी.एम. रोकडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.