वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाजी गरज वृक्षारोपण कार्यक्रम. - अशोक भैयांचे प्रतिपादन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : "आज पर्यावरणातील बदल हे कशाचे प्रतीक आहे तर बेसुमार झाडांची झालेली कत्तल आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ दिसते आहे. वृक्ष केवळ तापमान कमी करण्याचे काम करित नाही तर शुध्द आँक्सीजन देत असतात सोबत वाटसरुला सावली,फळ व पाऊस पडण्यासाठी मदत करतात.
तापमानाचे संतुलन करतात. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमाची सुरुवात करुन जास्तीत जास्त झाडे लावा व जगवा हा संदेश देत आहेत,ते याच कारणामुळे ! म्हणून झाडाचे येणाऱ्या काळात महत्त्व समजून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाजी गरज आहे' असे मौलिक मार्गदर्शन श्री अशोकजी भैया यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथिल राष्ट्रीय सेवा योजना,एन सी सी.कँडेड बाईज व गर्ल्स युनिट,क्रीडा विभाग, लोकसंख्या शिक्षण मंडळाच्या वतीने राबविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्य.प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, डॉ.आर.के.डांगे,डॉ रेखा मेश्राम, डाँ.असलम शेख,डॉ.धनराज खानोरकर,डॉ.मोहन कापगते,डॉ प्रकाश वट्टी,डॉ.के.के.गील प्रा.अभिजित परकरवार व सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांनी हे महाविद्यालय केवळ वृक्षारोपणच करित नाही तर एक विद्यार्थी एक झाड दत्तक दिले जाते त्याचे संगोपन केले जाते त्यामुळे ४२ एकर परिसर निसर्गरम्य झाले आहे हे एक जीवनमूल्यात्मक शिक्षण देवून वृक्षारोपण व संर्वधनाचे कार्य केले जाते. हे श्री अशोकजी भेंया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाविद्यालय पुढे वाटचाल करीत आहे.असे मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.प्रकाश वट्टी तर आभार लेफ्ट प्रा अभिजित परकरवारांनी मानले.यशस्वीतेसाठी संजू मेश्राम,सौरभ तलमले,विपूल यांनी अथक परिश्रम घेतले.