राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत कवी डॉ.धनराज खानोरकरांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.

राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत कवी डॉ.धनराज खानोरकरांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,२०/०८/२५ झाडीबोली साहित्य मंडळ,चिमूरच्या वतीने भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे आयोजन केले गले होते.या काव्यस्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.७१ कवींनी या स्पर्धेत राज्यातून सहभाग नोंदवला.या काव्यस्पर्धेचा निकाल तज्ज्ञांनी नुकताच  जाहीर केला.

   

यात प्रथम क्रमांकांचे मानकरी ब्रह्मपुरीचे सुप्रसिद्ध लेखक व कवी डॉ.धनराज खानोरकर यांच्या 'माय' कवितेला प्राप्त झाला असून त्यांचे पांच कवितासंग्रह व लोकप्रिय '" संजोरी " ललितबंध व संपादित ग्रंथसंपदा प्रकाशित आहे.द्वितीय क्रमांक सुनिल पोटे,राजुरा 'निळसर पृथ्वी' या कवितेला तर तृतीय क्रमांक सविता झाडे - पिसे,चिमूरच्या 'तुंबल्या गटारी' कवितेला आणि उत्तेजनार्थ पारितोषिक संदिप गायकवाड,नागपूरच्या 'बुद्ध' कवितेला व अरुण घोरपडे, चंद्रपूरच्या 'झाडे जगवा झाडे लावा' कवितेला प्राप्त झाला आहे. 

   

पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे असून  पारितोषिक वितरण एका शानदार समारंभात करण्यात येईल,असे झाडीबोली साहित्य मंडळ, चिमूर तालुका अध्यक्ष प्रकाश कोडापे, सचिव आनंद बोरकर, सल्लागार सुरेश डांगेंनी  कळविले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !