जीवन ज्योती विमा धनादेशाचे वितरण बँक व्यवस्थापक पराग तेलंग यांच्या हस्ते.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दि,२०/०८/२५ भारतीय स्टेट बँक शाखेच्या जीवन ज्योती विमा पॉलिसी योजनेअंतर्गत विमा पॉलिसी धारक तुळशीदास कामडी,अतुल धोटे,आशा सुरेश बनकरराहणार पिंपळगांव (भोसले )यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे मयताच्या वारसांना नामे,श्रीमती उर्मिला तुळशीदास कामडी
श्रीमती विद्या अतुल धोटे, श्री सुरेश सोमाजी बनकर यांना भारतीय स्टेट बँक शाखा, अ-हेरनवरगांव चे शाखा व्यवस्थापक पराग तेलंग यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयाचे धनादेश दिले.
यावेळी बँकेचे कर्मचारी सतीश कुर्वे,शरद तलमले, सुरक्षा रक्षक संजय उईके,सीएससी सेंटर संचालिका किरण तलमले व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
जीवन ज्योती विमा पॉलिसी अंतर्गत मिळालेल्या दोन लाख रुपयाच्या धनादेशाबद्दल उर्मिला कांबडी, विद्या धोटे, सुरेश बनकर यांनी भारतीय स्टेट बँकेचे आभार मानले.