भरधाव वाहनाने 25 मेंढ्या चिरडल्या 2 मेंढपाळ जखमी,एक जण गंभीर असल्याने नागपूर ला हलविण्यात आले.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सावली : मुल - गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत 10 मेंढ्या चिरडल्या गेल्या.तसेच दोन मेंढीपाळही जखमी झाले.ही घटना दि,7/09/2025 रविवार ला रात्री 8.45 च्या सुमारास घडली.रवि अल्लीवार वय,38 वर्ष मुल,रामाजी अल्लीवार वय,62 वर्ष रा.गडीसुर्ला ता.मुल अशी जखमींची नाव आहेत.
मुल येथील रवि अल्लीवार आणि रामाजी अल्लीवार हे दोघे मेंढपाळ रविवारी रात्रौ मेंढ्यांचा कळप घेऊन गडचिरोली कडून मुल कडे राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करत होते.वैनगंगा नदी परिसरातील श्री.बार जवळ ते आले आणि रात्रौ झाल्यामुळे बार जवळ खाली जागेत मुक्काम करून ते सकाळी पहाटे निघणार होते.
परंतु नदी पार केले आणि विरुद्ध दिशेने मुल कडून गडचिरोली कडे जाणारा ट्रक खुप भरधाव वेगाने जात असताना वाहनाने जोरदार धडक देत रवि अल्लीवार, रामाजी अल्लीवार दोघे जखमी झाले.बार मधील काही काम करणारे धावत येऊन त्यांना उचलून साईडला ठेवले. रुग्णवाहीका बोलावून गडचिरोली येथे भरती करण्यात आले.
अंदाजे 25 मेंढ्यांचा चिरडून मृत्युमुखी पडल्या.घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना भेटले.जखमी रवि अल्लीवार यांचे हात दोन ठिकाणी मोडले असून डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना ऑपरेशन सांगितल्याने नागपूर रुग्णालय ला नेण्यात आले अशी माहिती त्यांचे नातेवाईक दिले.त्यांच्यावर नागपूर उपचार सुरू आहे.
चराई पासेस वन विभागाकडून न मिळाल्याने समाजातील मेंढपाळ बांधवाना गाव सोडून दुसऱ्या जिल्ह्यात भंटकती करावा लागत असतो.यावर शासन उपाय योजना राबविल्यास जीव गमावण्याची वेळ कुरमार/धनगर समाजावर ही वेळ येणार नाही.काही राजकीय लोक निवडणूक आली.कि पोळी भाजून घेण्यासाठी येतात. आश्वासन देतात.नंतर दुर्लक्ष करतात.
स्थानिक नागरिकांनी अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सावली चे पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पि.एस.आय.सचिन मुसळे व कर्मचारी तपास जलद गतीने करून 24 तासाच्या आत वाहनाचा शोध घेऊन ट्रकसह वाहन चालकाला अटक करून ताब्यात घेतले आहे.

