आरमोरी नगर परिषद अंतर्गत शाळा,अभ्यासिका नसल्यामुळे आकारण्यात येणारा शिक्षण कर रद्द करण्यात यावा.
📍वंचित बहुजन आघाडी चे नगर परिषद चे मुख्याधिकारी व तहसीलदार मार्फत नगर विकास मंत्री यांना निवेदन.
एस.के.24 तास
आरमोरी : शिक्षण कर हा नगरपरिषदेद्वारे गोळा केला जाणारा कर आहे जो नागरिकांना आवश्यक शिक्षण सुविधा पुरविण्यासाठी वापरला जातो परंतु आरमोरी नगरपरिषद मध्ये तसे होताना दिसून येत नाही आरमोरी नगर परिषदेने येथील नागरिकांना सन 2018 ते आजपर्यंत कोणत्याही शिक्षण सुविधेवर खर्च न केल्याने वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे यांच्या नेतृत्वात नगरपरिषद कार्यालय धडक देऊन मुख्याधिकारी तसेच तहसीलदार मार्फत नगर विकास मंत्री यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी मगरे यांच्याशी विविध विषयावर चर्चा करताना घरट्याच्याद्वारे आकारण्यात येणारे शिक्षण कर घेण्याच्या माध्यमातून आरमोरी येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे आरमोरी नगर परिषदेअंतर्गत शाळाच नाही तर घोडा केला जाणारा शिक्षण कर कुठे वापरला जातो अशा विविध विषयावर चर्चा करून नगर परिषदेच्या शाळा अभ्यासिका व शिक्षण सुविधा येथील नागरिकांना पुरविण्यात याव्यात अशी मागणी केली.
यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे, जिल्हा महासचिव राजरत्न मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष भीमराव शेंडे,वडसा शहराध्यक्ष अशोक मेश्राम, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष नर्मदा मेश्राम, आरमोरी तालुकाध्यक्ष कुमता मेश्राम,शहराध्यक्ष लता बारसागडे संध्या रामटेके ज्योती उंदीरवाडे ज्योती दहिकर व इतर बहुसंख्य वंचित चे पदाधिकारी उपस्थित होते.