महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय चिरोली येथील 17 वर्षाखालील मुलांनी तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत मारली बाजी.
राजेंद्र वाढई - उपसंपादक - एस.के.24 तास
मुल : शैक्षणिक क्षेत्र 2025 ते 2026 मध्ये तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत अनुप तुकाराम मांदाडे संकेत साईनाथ मांदाडे शंतनु संजय ढोले रोहित प्रवीण गुरनुले राकेश नरेश गुडलावार प्रतीक रामचंद्र निकुरे पियुष प्रवीण मोहुर्ले त्रुशेंद्र लक्ष्मण ढोले आदित्य अतिप शेंडे अमर भालचंद्र शेंडे अमर नवनाथ शेंडे सुभेद सुनील निसाद ह्या 17 वर्षाखालील विद्यार्थ्यांची राजगड विरुद्ध झालेल्या सामन्यात बाजी मारून महात्मा ज्योतिबा फुले शाळेचा नाव लौकिक केले.
मानाचा तुरा रोवल्या गेला सदर विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री माननीय विकास डोर्लीकर शिक्षक यांच्या मार्गदर्शनाचा निरोप लाभ मिळाला.तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी सर्व शिक्षकांचे व मार्गदर्शक शिक्षक श्री विकास डोर्लीकर सर व बी पी कामिडवार शिक्षिका यांचे संस्थेच्या व शाळेच्या वतीने मुख्यध्यापक श्री.माननीय पी.एस. सेलोकर सर ज्येष्ठ शिक्षक श्री.आर.एस.गडमळे सर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय चिरोली शैक्षणिक क्षेत्र 2024 ते 2025 मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेत कुमारी सुनेरी मंगेश मंडलवार केलझर तर एन एम एम एस परीक्षेमध्ये कुमारी देवयानी महेश चिरोली देवकर कुमारी श्रावणी घनश्याम मोहुर्ले यांनी यश संपादन केले विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यालयात नवोदय क्रमांक द्वारे स्पर्धा परीक्षा शालेय शिक्षक तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षेसाठी मुख्याध्यापक श्री.पी.ए.शेलोकर व ज्येष्ठ शिक्षक श्री.आर एस गरमडे यांनी यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षिका निरंतर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन करीत असतात शाळा ही त्रिमोत्तर वाढत असून विद्यार्थ्यांना बौद्धिक गुणवत्तेत सहमैदानी खेळात यश संपादनासाठी सर्व कर्मचारी तत्पर असतात.