जानाळा येथे अनुसूचित जमातीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातच यासाठी “ आदी सेवा केंद्र ” सुरू.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : नागरिकांच्या ज्या काही समस्या आहे, त्या आदि सेवा केंद्रांतर्गत सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा.व्हिलेज ॲक्शन प्लॅन तयार करत असताना गावातील आवश्यक असलेल्या बाबी सुटून जाणार नाही, याकडे आदि कर्मयोगी यांनी लक्ष द्यावे.सर्व आराखडे हे गावामध्ये शिवार फेरी करून करायचे आहे आणि त्याला 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेमध्ये मंजुरी द्यायची आहे.
सदर आराखडे हे जिल्हास्तरीय समितीकडे येतील आणि नंतर ते राज्यस्तरीय समितीकडे जातील. अभियानांतर्गत निश्चित केलेले सर्व उपक्रम दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचनाबैठकीत परस्पर सहकार्य वाढवून आदिवासी समाजाच्या शाश्वत विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे ठरले.
सरपंच दर्शना किन्नाके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी आदिवासी मंत्रालयाच्या संचालिका दीपाली माशीलकर व प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते.केंद्रातून आदिवासी योजनांची माहिती व अर्ज प्रक्रिया गावातच होणार आहे. कार्यक्रमाला अनिल बुटे, भूषण काळे, दिलीप चौधरी, रवींद्र मरापे, शालू कुंभरे, मंजूबाई नैताम व ग्रामस्थ उपस्थित होते.