जिवती येथे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करा या मागणी साठी सकल धनगर जमात जिवती च्या वतीने मा.तहसीलदार यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री यांना निवेदन सादर.
एस.के.24 तास
जिवती : चंद्रपूर जिल्हातील शेवटच्या टोकावर असणाऱ्या जिवती तालुक्यातुन सकल धनगर समाज जिवती च्या वतीने धनगर जमातीच्या यादीतील नोंद क्रमांक 36 मधील धनगड (Dhangad) या नावाच्या ऐवजी धनगर (Dhangar) असा आदेश जारी करावा.
व महाराष्ट्र राज्यात धनगड नावाची कोणतीही जमात अस्तित्वात नाही जे आहेत ते सर्व धनगर च आहेत या संदर्भात मा.मुंबई उच्च न्यायालयाने दाखल याचिका क्रमांक ४९१९/२०१७ मध्ये महाराष्ट्र राज्यात धनगड नावाची जमात अस्तित्वात नसल्याचे प्रतिज्ञापत्रात सुद्धा नमूद केले आहे.
तसेच राज्यात इतर कोणत्याही जाती/जमातीने धनगड या नोंदिवर धनगर या जमाती शिवाय आतापर्यंत दावा केलेला नाही 1956 पूर्वी किंवा त्यानंतर सुद्धा महाराष्ट्रात धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही यावरून स्पष्ट होत आहे की,जे आहेत ते सर्व धनगरच आहेत.
त्यामुळे धनगड नावाच्या ऐवजी धनगर असा आदेश जारी करून जालना जिल्ह्यातील दीपकभाऊ बोऱ्हाडे यांच्या संविधानिक अधिकार मान्य करून महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजाला न्याय देऊन धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समावीष्ठ करण्या यासंदर्भात मा.तहासीलदार जिवती यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंडे फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी उपस्थित धनगर समाजाचे युवा नेते गोविंद गोरे,बाबाराव पोले, बापूराव गोरे,अशोक पोले,मारोती सलगर केरबा नळनर, बालाजी नळनर,बालाजी गडदे,निवृती सलगर,बाजीराव सलगर जनार्धन खांडेकर,आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.