राष्ट्रीय पोषण माह धानोरा,पेंढरी व करवाफा बीट येथे उत्साहात साजरा.

राष्ट्रीय पोषण माह धानोरा,पेंढरी व करवाफा बीट येथे उत्साहात साजरा.


एस.के.24 तास


धानोरा : धानोरा तालुक्यातील पेंढरी व करवाफा बीट येथे राष्ट्रीय पोषण माह विविध उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम CRY संस्था गडचिरोली व एकात्मिक बाल विकास विभाग, व आरोग्य विभाग धानोरा  यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच धानोरा क्षेत्रात सुरू असलेल्या आरोग्य व पोषण (DI) प्रकल्पाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला.



दिनक २३/०९/२०२५ कारवाफा येथे जिल्हा परिषद शाळा प्रांगणात गावस्तरावरील विविध भागधाराकांसोबत आरोग्य आणि पोषण जागरूकता मोहीम- पोषण माह कार्यक्रम घेणात आले.या कार्यक्रमामध्ये विविध विभागाचे प्रमुख आपआपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या योजना व सेवा यांची माहिती व जनसामन्य पर्यंत योजना कश्या पोहचतीलव तसेच नागरिकांनी याचा लाभ कसा घ्यावा  या बद्दल मार्गदर्शन केले. 


व या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख मार्गदर्शक CRY जिल्हा समन्वयक श्री. अंकुश राठोड यांनी केली आणि या कार्यक्रमाला उपस्थित  BDO श्री. रोशनकुमार दुबे  यांनी आरोग्य आणि पोषण तसेच सेवा व योजना या बद्दल  मार्गदर्शन दिले.तर THO डॉ.अविनाश दहीफळे आणि MO डॉ.होरे, यांनी आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या योजना व सेवा यांची माहिती दिली.


तसेच  CDPO कु. गेडाम, CHO मॅडम तसेच सुपरवायझर मडावी मॅडम व जेंघटे मॅडम यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प बद्दल योजना व सुविधा यांच्यावर मार्गदर्शन दिले   याशिवाय स्थानिक शाळांचे मुख्याध्यापक, CRY-DI गडचिरोलीचे अधिकारी, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महिला बचत गट आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. हे कार्यक्रम कारवाफा प्रमाणे रोन्दावाही ,कामथडा, हडझर, ढोरगट्टा ,फुलबोडी ,गोटा , या गावांत उत्साहात साजरे केले   


कार्यक्रमादरम्यान पोषण अभियानाचे महत्त्व, बालकाचे पहिले 1000 दिवस, कुपोषण प्रतिबंध, ऍनिमिया नियंत्रण, स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि संतुलित आहार याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. CRY टीमने THR व स्थानिक भाज्या-फळांपासून बनविलेल्या पौष्टिक पदार्थांचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच गावागावांत कलापथकाद्वारे जनजागृती करण्यात आली.


विद्यार्थ्यांनी पोषण गीत सादर करून वातावरण रंगतदार केले.महिलांनी पाककृतीत उत्स्फूर्त सहभाग घेत पोषणा विषयी माहिती मिळवली. यावेळी हेल्थ कॅम्प आयोजित करून महिला,बालक व ग्रामस्थांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. 


CRY-आरोग्य व पोषण (DI) प्रकल्पांतर्गत SAM, MAM व अति जोखमीच्या गर्भवतींना पोषण किट्स वितरित करण्यात आल्या. तसेच 19 अंगणवाडी केंद्रांना शेवग्याचे रोप व पोषण वाटिका किट देण्यात आले.


या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्य, पोषण व स्वच्छतेबाबत ठोस जनजागृती झाली. महिलांना संतुलित आहाराचे महत्त्व पटले, तसेच बालकांचे पहिले 1000 दिवस पोषणाच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत याची जाणीव झाली. आरोग्य विभाग, ICDS, CRY-DI गडचिरोली व ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !