आदर्श सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती मूल येथे संतोषसिंह रावत यांच्या प्रयत्नांने शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
एस.के.24 तास
मुल : सहकार तत्वावर तालुक्यातील शेतकरी बांधवांना बाजार भावापेक्षा दरवर्षीच अतिशय कमी दराने रासायनिक खते व सर्व प्रकारची कीटक नाशक औषधी सहकार नियमानुसार शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.यामध्ये समितीचे नेतृत्व मार्गदर्शक तथा प्रदेश काँग्रेसचे महासचिव व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष,माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात व
मार्गदर्शनाखाली समितीचे सभापती पुरुषोत्तम भूरसे, उपसभापती विनोद गाजेवार व समस्त अनुभवी संचालक मंडळ यांच्या सहकार्याने चालू वर्ष १ एप्रिल २०२३ ते २५ आक्तोंबर २०२४ पर्यंत खरीप हंगामात सुरवातीलाच शेतकऱ्यांना अत्यावश्यक असणार अशा स्वरूपात तालुक्यात सर्वाधिक अतिशय कमी दरात रासायनिक खते व सर्व रोगांवर उपयुक्त असणारे कीटक नाशक औषधे उपलब्ध करुन शेतकऱ्यांच्या पाठीशी आदर्श सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती मुल पाठीशी राहिली आहे.
परंतु संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात त्याच वेळेला युरिया खताची मोठी मागणी करण्यात आली होती. परंतु शासनस्तरावरच युरिया खताचा तुटवडा होता. असे असताना सुद्धा खरेदी विक्री समितीने शासनाकडे एकसारखी मागणी रेटून धरल्याने अखेर शासनाने मूल तालुक्यात सर्वात प्रथम आदर्श खरेदी विक्री समिती मूल येथे २० टन युरिया खताचा पुरवठा झाला असून मूल तालुक्यातील समस्त शेतकरी युरिया खताची वाट बघत होते. त्यांना युरिया खताची विक्री सोसायटीच्या कार्यालयामध्ये अतिशय कमी वाजवी दरात विक्री केली जात आहे.
यापूर्वीही शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या खतांचा पुरवठा करण्यात आला होता. यासाठी रासायनिक खत पुरवठा करणारे कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत संतोषसिंह रावत यांनी चर्चा करुन खत उपलब्ध करुन दिला आहे. यासाठी तज्ञ मार्गदर्शक,अनुभवी सल्लागार यांचे तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन प्रसार व प्रचार करण्यासाठी समितीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे
व उपसभापती विनोद गाजेवार व अनुभवी संचालक मंडळ,व्यवस्थापक संदीप आलेवार यांचे प्रयत्नाने मूल तालुक्यातील शेतकऱ्यांची महत्वाची अडचण दूर केल्याबद्दल संतोषसिंह रावत व सभापती पुरुषोत्तम भुरसे, उपसभापती विनोद गाजेवार,व समस्त संचालक मंडळाचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहे.