परिवर्तन पॅनेलचा एकच निर्धार आरक्षण शिवाय नाही माघार.
एस.के.24 तास
नागपूर : हा निर्धार आता परिवर्तन ग्रुपच्या शेकडो तरुणांनी केला असून आता एस टी (ST) चे आरक्षण आपण घेतल्या शिवाय स्वस्थ बसायचं नाही या आरक्षणाचे लोन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवून लोकांमध्ये जनजागृती करून ही मोहीम फत्ते करायची असा निर्धार परिवर्तन ग्रुप च्या शेकडो सदस्यांनी केला.
असून,त्याची सुरवात राज्याचे महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना स्वतःभेटून व तसे निवेदन देऊन करण्यात आले.यावेळी साहेबांनी आपल्या ग्रुपला चर्चेसाठी लवकरच बोलावू व निर्णय घेऊ असे सांगितले.याच बरोबर आर्थिक विकास महामंडळाबद्दलही त्यांनी मी स्वतः दखल घेतो व विदर्भातील लोहार समाज बांधवांना यात स्थान देऊ असेही ते म्हणाले.
या शिष्टमंडळात श्री.जितेश मेश्राम चिमूर,श्री मधुकर शेंडे,नागपूर,श्री,उत्तम शेंडे गडचिरोली श्री.माणिकराव शेंडे भंडारा,श्री केवळराम चौधरी नागपूर,श्री ज्ञानेश्वर डहाके नागपूर श्री.हेमंत मेश्राम नागपूर,श्री मदनभाऊ सोनटक्के चंद्रपूर, श्री वासुदेव शेंडे चंद्रपूर,श्री भीष्मा शेंडे भद्रावती,श्री.सुरेश चंदनकर वर्धा
श्री,किशोर रामटेके तुमसर,श्री.प्रमोद दाभेकर चिमूर,श्री.नरेंद्र बावनकर बुट्टीबोरी,श्री,अंगद बावणे बुट्टीबोरी,श्री.ओंकार घुग्गुस्कर नागपूर,श्री.केशव तांदुळकर नागपूर,श्री.संतोष हरिहर कोराडी,श्री मेघश्याम दाभेकर वरोरा,श्री राजुभाऊ हंसकार नागपूर इत्यादी परिवर्तन ग्रुप चे सक्रीय सदस्य या वेळी उपस्थित होते.