बोंडेगाव येथील मतदारांचा न.प.निवडणूक मतदानावर बहिष्कार.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०१/०९/२५ ब्रम्हपुरी नगर परिषदेची निवडणूक नजिकच्या भविष्यात होऊ घातली आहे. त्याकरिता नगर परिषदेने प्रभाग रचनेचे प्रारूप तयार केले आहे.
प्रारूप प्रभाग रचनेत बोंडेगाव हुडकी वेगळी करून त्या भागाला प्रभाग क्रमांक 0६ मध्ये समाविष्ट केले आहे. वास्तविक बोंडेगाव व बोंडेगाव हुडकी हे एकच गाव असून हुडकी भागाला बोंडेगाव मधून वेगळा करण्याचा विरोधकांचा कुटिल डाव आहे असे बोंडेगाव वासियांचे मत झाले आहे. या बाबीकडे निवडणूक विभागाने लक्ष न दिल्यास व बोंडेगाव पासून बोंडेगाव हुडकी वेगळी झाल्यास ग्रामवासी मतदानावर बहिस्कार टाकणार.
या आशयाचे निवेदन आज दिनांक,०१ सप्टेंबर, २०२५ रोजी गाव वासियानी मान. जिल्हाधिकारी चंद्रपूर,मान. उप विभागीय अधिकारी,मान. तहसीलदार व मुख्याधिकारी ब्रम्हपुरी यांना दिले आहे.
निवेदन देतांना प्रामुख्याने श्री.बाळूभाऊ राऊत, शहर काँग्रेस अध्यक्ष, राजेश तलमले, गव्हर्नर रामटेके,चक्रेश करंबे, नेताजी मेश्राम, प्रा.डी के. मेश्राम,राममोहन ब्राडिया,तारकेश राऊत, लोकमन शास्त्रकार, वेणुदास करंबे, दिनेश मेश्राम, मधुकर ढोरे, सुधीर रामटेके
कलिचरण बगमारे, निखिल करंबे, अभय भागडकर, अक्षय कुथे, दिलगंभीर कुथे, पिंटू सौंदरकर, प्रदीप ठेंगरे, निखिल सहारे, पद्माकर रामटेके, प्रेमनाथ बगमारे, आकाश वैद्य, व इतर बोंडेगाव मधील जेष्ठ व युवा नागरिक उपस्थित होते.