मनुष्यबळ पुरवठा करणा-या कंपन्यांकडून कामगाराचे शोषण.
📍प्रशासनाचे दुर्लक्ष - कामगारांच्या मागण्यांची पूर्तता तात्काळ करा - वंचितची मागणी.
एस.के.24 तास
गडचिरोली : मनुष्यबळ पुरवठा करणां-या कंपन्या ओझोन असोसिएट प्रा.लि.चंद्रपूर व एमव्हीजी कंपनी नाशिक या कंपन्यांच्या अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला रुग्णालय गडचिरोली येथे शेकडोच्या स्वरुपात मनुष्यबळ पुरवठा केलेले आहे.
परंतु किमान वेतन कामगार कायद्याची पायमल्ली करून हुकूमशाही पध्दतीने कामगारांची सर्रास पिळवणूक सुरू असल्याने वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात शेकडोच्या संख्येत असलेल्या कामगारांनी जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या कार्यालयावर धडक देऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.माधूरी किलनाकेे यांच्याशी विविध समस्यावर चर्चा करतांना कंपनी व संबंधीत प्रशासनातील कर्मचारी कामगारांची कशी पिळवणूक व शोषण करीत आहेत त्याची सविस्तर माहिती देण्याात आली. व विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
जिल्हा शल्य चिकीत्सकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षापासून सदर कंपन्यांच्या अंतर्गत काम करीत असून सुद्धा आजपर्यंत नियुक्ती देण्यात आलेले नाहीत ते नियुक्ती आदेश सर्व कामगारांना देण्यात यावे,शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे मासीक वेतन देण्यात यावे, प्रत्येक महिण्याचे वेतन वेळेवर देण्यात यावे, कामगार कायद्याच्या अधिन राहून पी.एफ. देण्यात यावे, ईआयसी नंबर देण्यात यावे, सीएल आणि पीएल लागू करण्यात यावे.
सर्व कामगारांना मेडिकल लागू करण्यात यावे, ज्या कामाकरीता नियुक्ती करण्यात आली त्या व्यतिरीक्तचे काम करण्यास सक्ती करू नये, मासिक वेतन स्लिप देण्यात यावी,कामगारांना लागणा-या सुविधा नियमाप्रमाणे पुरविण्यात यावे आदी मागण्यांची पूर्तता तात्काळ करण्यात यावी अन्यथा कामबंद आंदोलन करण्यााचाही ईशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते जी.के.बारसिंगे, कवडू दुधे,विलास केळझरकर,तुळशिराम हजारे, संजय मेश्राम,अरविंद जेंगठे,सुभाष भोयर,ज्योती कावळे, वैशाली सालोटकर, राजकुमार डोंगरे,योगेश गोहने,वैभव रडके,मनिषा बोबडे,मनिषा मेश्राम,कुणाल भजभूजे, संगिता मंडलवार,सुक्ष्मा खोब्रागडे,जास्वंदा मेश्राम, पोर्णिमा डोगरे आदि शेकडो कामगार उपस्थित होते.