राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचे मुल पोलीस स्टेशन ला निवेदन.
राजेंद्र वाढई - उपसंपादक एस.के.24 तास
मुल : मुल तालुक्यात अलीकडील काळात शहर आणि ग्रामीण भागात मोठया प्रमाणात अवैध धंदाना ऊत आला असून यात तालुक्यातील तरुणाई बळी जात असल्याचे कारण दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितपवार गटाच्या महिला आघाडीने मुल पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा नैताम यांची भेट घेत अवैध धंदावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
मुल तालुक्याची शांतता प्रीय असलेली ओळ्ख गेल्या एक दोन वर्षात नाहीशी होत गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. तालुक्यातील अनेक गावात अवैध दारू, सट्टा, गांजा विक्रीचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील अनेक युवक गांजाच्या विळख्यात आल्यामुळे सर्वांसामान्य कुटूंबातील लोकांना यांचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे. यामुळे तालुक्यातील जनता भयभीत असल्याची चिंता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांजवळ व्यक्त केली.
मुल शहरात आणि ग्रामीण भागातील अवैध धंदाची माहिती पोलीस प्रशासनाच्या गुप्त विभागाला कशी होत नाही हिच मोठी शोकांतिका असल्याची जनता दबक्या आवाजात चर्चा करीत असून पोलीस प्रशासणाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करीत आहे. जुने पोलीस निरीक्षक जाऊन नव्याने रुजू झालेल्या मुल पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्री राठोड याच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ग्रामीण शहरी भागातील अवैध धंदावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका महिला आघाडी अध्यक्ष शीतल वाढगुरे, महिला नेत्या अर्चना चावरे, मुल शहर अध्यक्ष धारा मेश्राम,मालाताई शेंडे, सुवर्णाताई रामटेके, सिमाताई चिकाटे, उषा पोहनकर, वैशाली आलूलवार या महिला कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा इशारा : -
पोलीस प्रशासनाने वाढत्या अवैध धंदाकडे दुर्लक्ष केल्यास पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षित कृतीचा निषेध म्हणून गांधी चौक मुल येथे डपरे वाजवीत ढोबर फोडो आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.