गांजा,ड्रग्स,विकणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. - MIM पक्षाची मागणी.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गांजा, ड्रग्स,विकणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी घेऊन MIM पक्षाचे पदाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक निलोत्पल साहेबांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की गडचिरोली जिल्ह्यात बाहेर राज्यातून, व इतर जिल्ह्यातून गांजा,ड्रग्स मोठ्या प्रमाणात आयात करून गडचिरोली शहरात गांजा,ड्रग्स मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे.
गांजा,ड्रग्स,विक्रीमुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात आले आहे.चौदा,पंधरा वर्षाचे मुलं आणि मुली,गांजा,ड्रग्स चे अधीन झाले असून तरुण पिढीचे जीव धोक्यात आले आहे.गांजा,ड्रग्स,माफियांचे मुसक्या आवळून गडचिरोली जिल्ह्यातून हद्दपार करावा आणि गडचिरोली येथे गांजा, ड्रग्स, विकणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी.
MIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख,जिल्हा उपाध्यक्ष विपिन सूर्यवंशी, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, गोरक्षक दलाचे जिल्हा अध्यक्ष तथा गडचिरोली विधानसभा अध्यक्ष तौफिक सय्यद, युवा आघाडी शहर अध्यक्ष मुन्ना रामटेके, विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मुस्ताक सय्यद, विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष करणं मोहुर्ले, रेहान शेख
MIM महिला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद, महिला कार्याध्यक्षा शगुप्ता शेख, महिला जिल्हा उपाध्यक्ष जयाताई कोंडे, जिल्हा सचिव शमीना शेख, उज्वला क्षिरसाठ, किरण सहारे, आदि उपस्थित होते.