कवी डॉ.धनराज खानोरकरांचा सत्कार ; राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : दिनांक,१६/१०/२५ प्रसिद्ध कवी डॉ.धनराज खानोरकर यांची ३६ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत त्यांच्या ' माय ' कवितेचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान,चिमूरच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार,ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,भाऊराव पत्रे,ऍड. भूपेश पाटील, सुरेश डांगे, प्रकाश कोडापे उपस्थित होते.