भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१६/१०/२५ नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ग्रंथालय विभागातील भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम वाचन कक्षात डॉ.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर पुस्तकांची ग्रंथ प्रदर्शनी,भाषण स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, घेण्यात आल्या.
प्राचार्य डॉ.शेकोकर यांनी महाविद्यालयाचे प्रशस्त ग्रंथालय हे भूषणावह आहे, कारण नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात एकमेव असे सुसज्ज ग्रंथालय आमच्या नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयाचे आहे.
या ग्रंथालयाचे आश्रेयदाते संस्था सचिव अशोक जी भैया यांनी ०२ कोटी रुपये खर्च करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास पूर्ण करण्याकरिता विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा देण्याकरिता पूर्ण पणे ऑनलाईन व्यवस्थेने सुसज्ज असे ग्रंथालय निर्माण करून दिलेले आहे. याठिकाणी सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एम शेकोकर, प्राचार्य डॉ वरभे, डॉ. युवराज मेश्राम, भागाडकर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. वरभे यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाबद्दल विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शांताबाई भैय्या महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वरभे सर प्रमुख अतिथी होते त्यांनी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवन पटावर थोडक्यात प्रकाश टाकला, तसेच ग्रंथालय विभागाचे चेअरमन प्रा.डॉ.युवराज मेश्राम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाला डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम वाचन कक्षात भरपूर संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनय भागडकर यांनी केले तर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन श्री शशिकांत माडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री माणिक दुपारे सौरभ जयस्वाल रवींद्र मांढरे जोशना मोहूरले, प्रणाली गावतुरे, निलेश मुलमुले यांचे सहकार्य लाभले.